JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; 'बिंदिया चमकेगी' गाण्यावर 93 वर्षीय आजीचा भन्नाट डान्स, VIDEO

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; 'बिंदिया चमकेगी' गाण्यावर 93 वर्षीय आजीचा भन्नाट डान्स, VIDEO

आज आम्ही तुम्हाला एका वृद्ध आजीचा व्हिडिओ दाखवणार आहोत, जी 90 वर्षांपेक्षा जास्त वयातही असा अप्रतिम डान्स करत आहेत की पाहणारे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.

जाहिरात

93 वर्षीय आजीचा भन्नाट डान्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 जून : वय हा फक्त आकडा आहे, असं म्हणतात. अनेकदा वृद्ध लोकंही असं काहीतरी करतात, ज्यामुळे हे वाक्य खरंच असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. सोशल मीडियावर अनेकदा यासंबंधीचे व्हिडिओही पाहायला मिळतात. प्रत्येक व्हिडिओ असा नसतो, जो सगळ्यांचं लक्ष वेधेल. मात्र काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपण त्यावरुन नजरच हटवू शकत नाही. सध्या अशाच एका आजीबाईचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. याला म्हणतात विश्वास! आजोबांच्या तळहातावर उभा राहून मनसोक्त नाचला नातू, पाहा Video तुम्ही पाहिलं असेल की वृद्ध लोक अनेकदा बेडवर पडून आपल्या मृत्यूची वाट पाहात असतात. त्यांच्या शरीरातील समस्या त्यांना नीट उभाही राहू देत नाही. अशात त्यांना चालताही येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका वृद्ध आजीचा व्हिडिओ दाखवणार आहोत, जी 90 वर्षांपेक्षा जास्त वयातही असा अप्रतिम डान्स करत आहेत की पाहणारे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधला या आजीबाईचा डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. ज्या वयात अनेक लोक आपल्या बेडवरुनही स्वतः उठू शकत नाहीत. त्या वयात या आजीबाई ठुमके लगावताना दिसतात. व्हायरल क्लिपमध्ये वृद्ध महिला ‘बिंदिया चमकेगी’ हे जुनं गाणं ऐकताना दिसत आहे. ती या गाण्यावरच थिरकू लागते. महिलेचा डान्स पाहून कोणीही तिचा फॅन होईल. हा व्हिडिओ गीता नावाच्या युजरने @geetaranga17 या हँडलवरून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शननुसार हा व्हिडिओ एका वृद्धाश्रमातील आहे. यामध्ये पिवळ्या साडीत एक 93 वर्षीय महिला ‘बिंदिया चमकेगी’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. यूजर्स कमेंट करून या महिलेचं कौतुक करत आहेत. तसंच आपल्यालाही असंच आयुष्य जगायचं असल्याचं म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या