जाहिरात
मराठी बातम्या / Viral / याला म्हणतात विश्वास! आजोबांच्या तळहातावर उभा राहून मनसोक्त नाचला नातू, पाहा Video

याला म्हणतात विश्वास! आजोबांच्या तळहातावर उभा राहून मनसोक्त नाचला नातू, पाहा Video

आजोबांच्या तळहातावर नातवाचा डान्स

आजोबांच्या तळहातावर नातवाचा डान्स

नातू आजोबांच्या तळहातावर उभा आहे आणि पंजाबी गाणे ऐकून तो स्वतःला रोखू शकला नाही. मग त्या लहान मुलाने आजोबांच्या तळहातावर धमाल नृत्याची झलक दाखवली

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 जून : वृद्ध लोकांना त्यांच्या नातवंडांसह वेळ घालवणं आवडतं. आजी-आजोबांना नातवासोबत खेळायला एक वेगळाच आनंद वाटतो, ते त्यांच्यासोबत असताना एका वेगळ्याच उत्साहात राहतात. ज्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. कधी-कधी या आनंदाचं अशा जुगलबंदीत रूपांतर होतं, की पाहणाऱ्यांनाही कौतुक वाटतं. चिमुकला नातू आणि वृद्ध आजोबांची अशीच एक जोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. 3 गाड्यांनी एका मागोमाग चिमुकलीला दिली धडक, श्वास रोखणाऱ्या अपघाताचा Video व्हायरल @NarendraNeer007 या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक नातू आपल्या आजोबांच्या तळहातावर उभा राहून जबरदस्त नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. पंजाबी गाणं ऐकताच तळहातावर उभ्या असलेल्या चिमुकल्याचा डान्स करण्याचा मूड झाला आणि त्याने पाय वर करून भांगडा स्टाईलमध्ये डान्स केल्यावर तिथे असलेल्या लोकांनी जल्लोष केला.

जाहिरात

आजोबा आणि नातवाती ही जोडी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यातील नातवाचा डान्स तुमचंही मन जिंकेल. नातू आजोबांच्या तळहातावर उभा आहे आणि पंजाबी गाणे ऐकून तो स्वतःला रोखू शकला नाही. मग त्या लहान मुलाने आजोबांच्या तळहातावर धमाल नृत्याची झलक दाखवली. जे पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ अतिशय मनोरंजक आणि खास आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमधील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या मुलाचं धैर्य आणि संतुलन. त्याने चक्क तळहातावर उभा राहून डान्स केला आहे. त्याचबरोबर आजोबांचा कॉन्फिडेन्सही जबरदस्त आहे. कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या नातवाला खाली पडू देणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओला कॅप्शनही तशाच प्रकारे देण्यात आलं आहे. व्हिडिओ शेअर करणार्‍या व्यक्तीने लिहिलं – आजोबा आणि नातवाची जोडी धमाल करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात