JOIN US
मराठी बातम्या / Viral / GPS ने ट्रॅक केलं 'अफेअर'; नवऱ्यासमोर असं आलं बायकोचं 'डर्टी सिक्रेट'

GPS ने ट्रॅक केलं 'अफेअर'; नवऱ्यासमोर असं आलं बायकोचं 'डर्टी सिक्रेट'

बायको एकटी असताना काय करते हे जीपीएसने दाखवलं आणि पाहून नवरा हादरला.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 26 मार्च :  हल्ली बरेच लोक जीपीएस वापरतात. लोकेशन, ट्रॅकिंग इत्यादी कामांसाठी जीपीएसचा वापर होतो. पण याच जीपीएसमुळे एका व्यक्तीच्या त्याच्या पत्नीचं सिक्रेटही समजलं आहे. जीपीएसने नवऱ्यासमोर बायकोची पोलखोल केली आहे. बायको एकटी असताना असं काही करत होती की पाहून नवरा हादरला. कर्नाटकमधील हे प्रकरण आहे. बंगळुरूत राहणारी ही व्यक्ती, जिचं लग्न 2014 साली झालं. या कपलला एक सहा वर्षांची मुलगी आहे.  ही व्यक्ती खासगी नोकरी करते. कित्येक कालावधीपासून नाईट शिफ्टमध्ये काम करते. 2020 साली या व्यक्तीने एक कार खरेदी केली. ज्यात जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम आहे. त्याने आपल्या बायकोला या कारच्या जीपीएसबाबत सांगितलं नव्हतं. बोंबला! गर्लफ्रेंडच्या जॉब इंटरव्ह्यूमुळे बॉयफ्रेंड तुरुंगात; पोलिसांनी केली अटक कारण… ही व्यक्ती नाइट शिफ्टमध्ये काम करायची. कामावर असतानाच त्याला जीपीएसमुळे कारची हालचाल झाल्याचं समजलं. त्याची कार एका हॉटेलबाहेर दिसली. टाइम्स इंडियाच्या वृत्तानुसार या व्यक्तीने सांगितलं, मी एक दिवस नाईट शिफ्टमध्ये काम करत होतो, तेव्हा मला समजलं की कुणीतरी माझी कार चालवलं आहे. जीपीएस पाहिलं तेव्हा कार मध्यरात्री एका हॉटेलबाहेर थांबली होती. सकाळी पाच वाजता ही कार घरी आली.

यानंतर ही व्यक्ती त्या हॉटलेमध्ये पोहोचली जिथं ही कार होती. तिथं समजलं की त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड त्या हॉटेलमध्ये होते. दोघांनीवोटर आयडी वापरून एक रूम बुक केली होती. उतावळी नवरी अन्…! लग्नाआधी नवरदेवाने पुरवली नाही ‘ती’ हौस; तिनं उचललं टोकाचं पाऊल कारच्या जीपीएसमुळे त्याच्या बायकोचा खरा चेहरा त्याच्यासमोर आला, बायकोच्या अफेअरबाबत समजलं. बायकोचं डर्टी सिक्रेट समजता. व्यक्तीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलीस, कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या