सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 19 जून : हत्तींच्या कळपाचे हे चित्र तुम्ही याआधी पाहिले असेल. पण या फोटोत किती हत्ती आहेत हे तुम्ही सांगू शकाल का? जर तुम्हाला फक्त 4 हत्ती दिसत असतील तर भाऊ, तुम्ही हे चित्र काळजीपूर्वक पहा. कारण या फोटोत 7 हत्ती आहेत. होय, हा विनोद नाही. काही हुशार लोकांनी तर संपूर्ण हत्ती शोधून काढले आहेत. तथापि, बहुतेक वापरकर्त्यांना फक्त 5 आणि 4 हत्ती दिसत आहेत. तुम्हीही करून पहा. आणि हो, कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला किती हत्ती दिसतात? रोज तेच तेच काम करुन मेंदूला कंटाळा आला की मग तो दुसरं काही विचारच कारत नाही आणि त्याची काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच असे काही लोक आहेत, जे आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी त्याला एक एक चॅलेंजेस देतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. यासंबंधीत अनेक चॅलेंज सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात. दोन सारख्याच दिसणाऱ्या फोटोत आहेत 7 फरक, तुम्ही ते शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का? सध्या असंच एक चॅलेंज समोर आलं आहे, जो सोडवताना तुमच्या नाकी नऊ येतील. हो हे खरं आहे. हा वाईल्ड लाईफ संबंधीत एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. ज्यामध्ये चार हत्ती नदीकाठी पिणी पिताना दिसत आहे. पण गंमत म्हणजे यामध्ये 4 नाही तर 7 हत्ती लपले आहेत आणि तुम्हाला ते शोधायचे आहे. अनेक लोकांना प्रयत्न करुन देखील यामध्ये 7 हत्ती दिसले नाहीत. हे काम तुम्हाला सोपं वाटत असलं तरी देखील सोप नाही कारण सहजासहजी तुम्हाला सात हत्ती यामध्ये दिसत नाहीत. फोटोमध्ये तर तुम्ही अनेक प्रयत्न केलेत तरी तुम्हाला 4 पेक्षा जास्त हत्ती दिसणार नाहीत. पण जेव्हा तुम्ही याचा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये सहा हत्ती दिसतील. Optical Illusion : दोन समान चित्रांमध्ये 3 फरक शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? खरंतर हत्ती पाणी पिताना ते एका ओळीत असताना त्यांचा फोटो काढला गेला आहे. ज्यामुळे त्यांच्या मागे असलेले हत्ती दिसत नाहीत. पण मग आता प्रश्न असा की व्हिडीओत देखील 6च हत्ती दिसतायत मग एक हत्ती कुठे आहे?
उजव्या बाजूला जे दोन हत्ती चालत जात आहेत. त्या हत्तींच्या पायाकडे पाहा, त्या दोन हत्तींच्यामध्ये एक लहान हत्ती आहे. मध्येच त्याची सोंड देखील हलताना दिसत आहे. तोच आहे तुमचा सातवा हत्ती.
आता तुम्हाला यामधील सातवा हत्ती नक्कीच दिसला असेल, चला मग तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना तो शोधता येतोय का.