JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला उंटानं घडवली अद्दल; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला उंटानं घडवली अद्दल; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

तरुणाची उंटानं चांगलीच खोड मोडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 फेब्रुवारी : अनेकदा जे माणसांना समजत नाही, ते मुक्या जीवांना समजतं आणि हे प्राणीच माणसांना अक्कल शिकवतात. असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे, तो म्हणजे एका उंटाचा (Camel). रस्त्यावर कळपानं जाणाऱ्या उंटापैकी एका उंटानं वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. माणसांना जे कळतं पण वळत नाही, ते प्राण्यांना कळतं आणि वळतं इतकंच नव्हे तर माणसांनाही ते शिकवतात, असंच सांगणारा हा दुर्मिळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता उंटाचा कळप रस्त्यावरून जात आहे. तिथून पुढे जायला जागा नाही. पण मागून येणारा बाईकस्वार ज्याला उंटाच्या पुढे जायची घाई आहे, तो आधी उंटांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला काही जागा मिळत नाही. पण तो फुटपाथवरून आपली दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा एक उंट त्या व्यक्तीला जोरदार लाथ मारून ढकलून देतो. हे वाचा -  इवल्याशा बोक्यानं वाचवला दोन चिमुकल्यांचा जीव, जीवाचं बलिदान देत ठरला हीरो नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला पण तोल मात्र जाताजात राहिला. या घटनेनंतर दुचाकीस्वार पुरता गांगरून गेला होता. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रियादेखील येत आहेत. व्हिडीओ पाहून तसं हसायलादेखील येतं आहे. पण माणूस करत असलेल्या चुकांची जाणीवदेखील या व्हिडीओतून होते. वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी पाळणं आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा ते पाळले जात नाहीत.  हा व्हिडीओ पाहून तरी असा चुका करणाऱ्या माणसांनी नक्की धडा घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या