मराठी बातम्या /बातम्या /Viral /इवल्याशा बोक्यानं वाचवला दोन चिमुकल्यांचा जीव, जीवाचं बलिदान देत ठरला हीरो

इवल्याशा बोक्यानं वाचवला दोन चिमुकल्यांचा जीव, जीवाचं बलिदान देत ठरला हीरो

मांजरीला आपण चांगला पाळीव प्राणी मानतो. एका मांजरीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

मांजरीला आपण चांगला पाळीव प्राणी मानतो. एका मांजरीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

मांजरीला आपण चांगला पाळीव प्राणी मानतो. एका मांजरीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे.

क्वीन्सलॅंड, 18 फेब्रुवारी : एक पाळीव बोका (pet cat) सध्या मोठाच हिरो ठरला आहे. लोक त्याला चार पायांचा हिरो (four legged hero) म्हणत आहेत. कारण तिनं जीवाचं बलिदान देत दोन लहान मुलांना (saved two kids) वाचवलं.

अत्यंत विषारी सापांपासून (poisonous snake) या बोक्यापासून दोन लहान मुलांना वाचवलं. एक ऑर्थर (Arthur) नावाची मांजर आपल्या मागच्या अंगणात खेळत होती. तिच्यासोबत दोन लहान मुलं खेळत होती. त्याचवेळी ऑर्थरला एक अत्यंत विषारी साप दिसला.

ही अत्यंत गोंडस बोका दोन भावंडांना वाचवायला धावला. ऍनिमल इमर्जन्सी सर्व्हिस (Animal emergency service) या पेजवर याबाबत माहिती दिलेली आहे. या चिमुकल्या मुलांना वाचवताना ऑर्थरचा ईस्टर्न ब्राऊन स्नेक (eastern brown snake) या विषारी सापानं अत्यंत जीवघेणा चावा घेतला.

मात्र यानंतर ती जमिनीवर कोसळली आणि काही क्षणातच लवकर उठून उभी राहिली जणू काही काहीच घडलं नव्हतं. दोन लहान मुलांना अंगणाच्या बाहेर घेऊन जाण्याच्या गडबडीत असलेल्या कुटुंबाला मात्र या सगळ्यातलं काहीच  लक्षात आलं नाही. इमर्जन्सी सर्व्हिसनं यानंतर म्हटलं, की सापानं चावा घेतल्यावर अशा कोसळण्याच्या घटना घडत असतात. मात्र पाळीव प्राणी पाळणाऱ्यांना याबाबत जास्त माहिती नसते.

ऑर्थर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कोसळला. आता त्याला उठता येत नव्हतं. ऑर्थरच्या मालकानं त्याला तातडीनं तन्व्हा इथल्या हॉस्पिटलला (hospital) नेलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांना (vet) आढळलं, की ऑर्थर आता बरा होण्यापलीकडे गेलेला आहे.

हे कुटुंब ऑर्थर कायमचा सोडून गेल्यावर (dead) दुःखात बुडालं. ऑर्थरनं आमच्या  जीव वाचवून केलेले उपकार फेडण्याच्या पलिकडचे आहेत असं ऑर्थरचे मालक सांगतात. ऑर्थरला आठवताना ते म्हणतात, 'तो कमालीचा खेळकर आणि खोडकर होता. आम्ही त्याला कधीच विसरू शकत नाही.'

हेही वाचा वाह! तहानलेल्या सापानं प्यायलं चक्क ओंजळीतून पाणी, वनाधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

ईस्टर्न ब्राऊन स्नेक हा जगातील अत्यंत विषारी सापांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. या सापाच्या विषामुळे पक्षाघात होऊ शकतो. यातून चावलेली व्यक्ती किंवा प्राणी क्षणात कोसळते.

First published:
top videos

    Tags: Cat, Snake, Viral video.