JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुत्रा चावला म्हणून मुंबईच्या तरुणाने खाल्ले महिलेच्या चेहऱ्याचे मांस, नक्की हा प्रकार आहे तरी काय?

कुत्रा चावला म्हणून मुंबईच्या तरुणाने खाल्ले महिलेच्या चेहऱ्याचे मांस, नक्की हा प्रकार आहे तरी काय?

या तरुणाने असं का केलं? असा प्रश्न उपस्थीत होउ लागला त्यामध्ये असे समोर आले की हा आरोपी हायड्रोफोबिया या आजाराने ग्रस्त होता. त्याच्यामध्ये मनोविकाराची लक्षणेही आढळून आली आहेत.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 31 मे : कधी-कधी आपल्यासमोर अशी काही प्रकरणं येतात की, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. असंच एक प्रकरण सध्या राजस्थानमधून समोर आलं आहे, जिथे एका तरुणाने एका महिलेचं मांस खाल्लं. ज्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि बातमी वाऱ्यासारखी पसरु लागली. या तरुणाने असं का केलं? असा प्रश्न उपस्थीत होउ लागला त्यामध्ये असे समोर आले की हा आरोपी हायड्रोफोबिया या आजाराने ग्रस्त होता. त्याच्यामध्ये मनोविकाराची लक्षणेही आढळून आली आहेत. हा असा आजार आहे ज्यामध्ये माणूस हिंसक होतो. आरोपीच्या हत्येनंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की, एखादा माणूस असा कसा बनू शकतो आणि तो माणसाचे मांस कसं खाऊ शकतो? तर याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. यूकेमधील ‘झोम्बी ड्रग’मुळे पहिला मृत्यू, नेमका हा प्रकार काय? या आरोपीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले की तो हायड्रोफोबियाने ग्रस्त आहे. मग आता प्रश्न असा की हा हायड्रोफोबिया म्हणजे काय? हा आजार रेबीज कुत्र्याच्या चाव्यामुळे होतो. हा रोग रुग्णामध्ये 7 ते 10 दिवसात विकसित होतो. डॉक्टरांनी सांगितले की, यामध्ये रुग्णाला हवा, पाणी आणि प्रकाशाची भीती वाटते. डॉक्टरांनी सांगितले की या प्रकारानंतर तरुणाला जेव्हा रुग्णालयात आणले गेले, तेव्हा तपासणी केली असता प्रथम त्याला पाणी देण्यात आले, मात्र तो पुन्हा पुन्हा पाणी फेकत होता आणि प्रकाशाची त्याला भीती वाटत होता. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की त्याला हायड्रोफोबिया झाला असावा. सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

हायड्रोफोबियाची लक्षणे कोणती आहेत आणि एखादी व्यक्ती बरी होऊ शकते का? डॉक्टरांच्या मते, हायड्रोफोबियाची मुख्य लक्षणे म्हणजे रुग्णाला हवा, पाणी आणि प्रकाशाची भीती वाटते. हा एक असाध्य रोग आहे. जर एखाद्या व्यक्तीला हायड्रोफोबिया झाला तर त्याचा मृत्यू 10 ते 11 दिवसांत निश्चित आहे. यामध्ये संपूर्ण मेंदू खराब होतो. पण असे अनेक रुग्ण आहेत, जे रेबीजच्या हायड्रोफोबियाने ग्रस्त झाल्यानंतर देखील बरे झाले आहेत. रात्री 3 वाजता हॉस्पीटलमध्ये दिसली रहस्यमय गोष्ट, Video पाहून नेटकऱ्यांना फूटला घाम हायड्रोफोबियाच्या रुग्णाने एखाद्याचा जीव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याला फ्युरस रेबीज म्हणतात. यामध्ये रुग्ण शांत राहत नाही. तो कोणावरही हल्ला करते, चावते आणि स्क्रॅच करू शकते. या प्रकरणाला हायड्रोफोबिया फ्युरस रेबीज म्हणतात. जर कुत्र्याच्या पिल्लू माणसाला चावला असेल आणि विषाणू फारच कमी प्रमाणात असेलस तर अशा परिस्थितीत हा विषाणू मानवी शरीरात राहतो आणि आयुष्यात कधीही 3 महिने किंवा 6 किंवा 10 वर्षांनी तो पुन्हा सक्रिय होतो आणि हायड्रोफोबिया येऊ शकतो. त्याच्या घटनेची किती प्रकरणे नोंदवली गेली आहेत? डॉक्टरांनी सांगितले की, जगात आतापर्यंत हायड्रोफोबिया फ्युरोज रेबीजची फक्त 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पण एका रुग्णाने एखाद्याला मारण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? २६ मे रोजी मृत महिला शांती देवी जंगलात शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. शेतातून हिरवी भाजी घेऊन ती घरी परतत होती. यादरम्यान एका तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने हल्ला करून तिचे डोके फोडले. ज्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या तरुणाने मृताच्या चेहऱ्याचे मांस ओरबाडून खाल्ले. या तरुणाच्या चेहऱ्यावर महिलेच्या रक्ताचे डाग लागले होते. आधार कार्डवरून आरोपीची ओळख पटली आहे. हा 24 वर्षीय सुरेंद्र असून तो मुंबईचा रहिवासी आहे. आरोपीची अवस्था पाहून पोलिसांनी त्याला अटक करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याचाही मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या