JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! 'हॅप्पी मिल' मधून McDonald's ने मुलीला असं काही दिलं, बॉक्स उघडताच हादरले पालक

बापरे! 'हॅप्पी मिल' मधून McDonald's ने मुलीला असं काही दिलं, बॉक्स उघडताच हादरले पालक

मॅकडोनाल्डमध्ये गेल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांसाठी हॅप्पी मिल घेतलं पण त्यात असं काही होतं की त्यांना धक्काच बसला.

जाहिरात

मॅकडोनाल्डच्या हॅप्पी मिलच्या बॉक्समध्ये भलतीच वस्तू. (फोटो - प्रतीकात्मक)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 17 जून : मॅकडोनाल्ड म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असले. इथं वेगवेगळे मिल कॉम्बो मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे हॅप्पी मिल. खास लहान मुलांसाठी असलेलं हे मिल. ज्यात मुलांसाठी एक गिफ्ट म्हणून खेळणंही असतं. एका दाम्पत्याने आपल्या मुलांसाठी हे हॅप्पी मिल घेतलं. पण त्यात असं काही होतं की बॉक्स उघडताच ते हादरले. त्यांना मोठा धक्का बसला. अमेरिकेतील ही घटना आहे. ज्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. डॉन पॅरेट नावाच्या महिलेने मॅकडोनाल्डच्या या निष्काळजीपणाबाबतची माहिती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तिने सांगितल्यानुसार ती, तिचा नवरा  आणि त्यांच्या दोन मुली मिशिगनच्या वॉरेनमधील मॅकडोनाल्डमध्ये गेले होते. मोठी मुलगी एलियाना सात वर्षांची आहे तर लहान एवा दोन वर्षांची. या फॅमिलीने तिथं हॅप्पी मिल घेतलं.

एलियानाने हे हॅप्पी मिलचं पाकिट उघडताच आत जे दिसलं ते पाहून डॉन आणि तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.  त्यात असं काही होतं की तिने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बाबो! 20 रुपयाची मॅगी 400 रुपयाला; असं काय आहेत यात पाहा हा VIRAL VIDEO हॅप्पी मिलच्या बॉक्समध्ये चक्क एक बॉक्स कटर होता. बॉक्स कटर हा एक प्रकारचा चाकू असतो, ज्याने पॅक बॉक्स  उघडला जातो. हॅप्पी मिलच्या बॉक्समध्ये  हे बॉक्स कटर सापडल्याने ते शॉक झाले. तो इतका धारदार असतो की जर दोन्ही मुलांपैकी कुणाच्याही हातात गेला असता तर त्यांचा हात कापला असता. हॅप्पी मिलमध्ये बॉक्स कटर (फोटो - फेसबुक)

हॅप्पी मिलमध्ये बॉक्स कटर (फोटो - फेसबुक)

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार डॉन म्हणाली, तुम्ही अशा गोष्टी ऐकता पण प्रत्यक्षात असं घडू शकतं, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला कधीच इतकं टेन्शन आणि राग आला नव्हता. जर हा चाकू एवाच्या हातात गेला असता तर? जर तो एलियाना, एवा नाही तर तिसऱ्याच कुणा मुलाच्या हातात गेला असता तर काय झालं असतं? ओ तेरी! चक्क गोल गोल अंडा; काय आहे या अंड्याचा फंडा पाहा VIRAL VIDEO दरम्यान महिलेने याबाबत मॅकडोनाल्डला जाब विचारला. त्यावर रेस्टॉरंटच्या मॅनेजरने कर्मचारी लहान वस्तू ठेवण्यासाठी लहान हॅपी मिल बॉक्सचा वापर करतात, त्यामुळे त्यांनी चुकून चुकीचा बॉक्स दिला असावा असं स्पष्टीकरण दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या