नवी दिल्ली, 14 जून : मॅगी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आता पाऊस सुरू झाला की मॅगीसारखे पदार्थ खाण्याची मजा काही औरच. फक्त 2 मिनिटांत तयार होणारी ही मॅगी फक्त 20 रुपयाला मिळते. पण तुम्हाल हीच 20 रुपयाची मॅगी 400 रुपयाला मिळत असल्याचं कुणी सांगितलं तर… काय धक्का बसला ना? या 400 रुपयाच्या मॅगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका फूड ब्लॉगरने मॅगीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका ठिकाणी मिळत असलेल्या मॅगीची किंमत पाहून त्यालाही धक्का बसला आणि त्याने मॅग विक्रेत्याला मॅगीत सोनं टाकतोस का असं विचारत त्याच्या इतक्या किमतीमागील कारण जाणून घेतलं. विक्रेत्याने ही मॅगी महाग का ते सांगितलं. Yuck! पाणीपुरी काय आता भेळपुरी खातानाही विचार कराल; VIRAL VIDEO पाहूनच उलटी येईल आता 400 रुपयाच्या मॅगीत काय असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते पाहण्याची उत्सुकताही असेल. मॅगीचं एक पाकिट 20 रुपये पण त्यापासून तयार केली जाणारी ही मॅगी 400 रुपयाला आहे. म्हणजे एक प्लेट शिजवलेली मॅगी तुम्हाला 400 रुपयाला मिळेल. ही मॅगी इतकी महाग असण्याचं कारण ती शिजवण्याची पद्धत. सामान्यपणे आपण मॅगी पाण्यात शिजवतो. मग आतापर्यंत तुम्ही मॅगीचे वेगवेगळ्या विचित्र रेसिपी पाहिल्या असतील. कुणी अंडी घालून, कुणी आंबा घालून, कुणी फ्लेव्हर कोल्ड ड्रिंक घालून मॅगी शिजवली आहे. 400 रुपयांच्या मॅगीतही असाच अजब प्रयोग करण्यात आला आहे. याची रेसिपी या दुकानदाराने सांगितली आहे. तो ही मॅगी मटण करीबरोबर शिजवतो. त्यामुळेच त्याची किंमत इतकी जास्त आहे. कधी खाल्ला आहे का हा काळा आंबा? आतून कसा असतो VIDEO पाहा फूड ब्लॉगर हॅरी उप्पलने आपल्या @therealharryuppal या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.