नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : पाकिस्तानचा व्हायरल ‘पावरी’ व्हिडिओ भारतात खूप चर्चेत आहे. खास बाब म्हणजे आता हा व्हिडिओ राजकारणातही पोहोचला आहे. अभिनेते, खेळाडू आणि सर्वसामान्यांबरोबरच आता या व्हिडिओची झलक पश्चिम बंगालमधील आनंदपुरीमधील भाजप रॅलीमध्ये पाहायला मिळाला. रॅलीमध्ये सभेला संबोधित करताना भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी पक्षाच्या परिवर्तनाच्या मुद्द्यावरुन बोलताना पावरी या मीम व्हिडिओचा वापर केला. आता नड्डा यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. भाजप नेत्याने शेअर केला व्हिडिओ भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी झालेल्या रॅलीमध्ये पोडियममधून म्हणाले की, ही बंगालची प्रबुद्ध जनता आहे, येथे आपण सर्व आहोत आणि बंगालमध्ये परिवर्तनाची तयारी सुरू आहे. ही व्हिडिओ क्लीप ताजिंदर पाल सिंह बग्गा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे, जी बरीच चर्चेत आहे.
अनेक राजकीय पार्टी पावरी मीम्सचा केला वापर
हे ही वाचा- रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तर कुठून लढणार निवडणूक? या दोन जागांवर आहे नजर तसं पाहता केवळ भाजपने या मीमचा वापर केला असं नाही, तर यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी व्हायरल व्हिडिओचा वापर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) देखील भाजपवर निशाणा साधला व एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सार्वजनिक बैठकीत रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. हे शेअर करीत टीएमसीने लिहिलं की, ही बंगालमधील भाजप आहे..ही त्यांची जनसभा आहे…आणि येथे त्यांची पावरी होत आहे. आम आदमी पार्टीनेदेखील यासंदर्भातील एक मीम्स शेअर केलं आहे.