कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकाच दिवशी वाढदिवस.
कराची, 12 जुलै : कुटुंबं म्हटलं की बऱ्यापैकी त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही ना काही साम्य असतं. किमान आई-बाबा आणि त्यांची मुलं यांचे चेहरे थोडेफार मिळतेजुळते असतात किंवा त्यांची उंची सारखी असते. पण कधी एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्मही एकाच दिवशी झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? अशी एक अजब फॅमिली आहे. या अनोख्या कुटुंबाचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. अख्खं कुटुंब एकाच दिवशी बर्थडे साजरा करतं. सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल आपली आपल्या वाढदिवसाला, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला किंवा दुसरं मूल असेल तर ते पहिल्या मुलाच्या वाढदिवसाला जन्माला यावं. म्हणून काही पालक मुद्दामहून तसं प्लॅनिंग करतात. पण नैसर्गिकरित्या असा जन्म होणं म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. तोसुद्धा आई-बाबा आणि त्यांच्या सातही मुलाचा. पाकिस्तानातील हे कुटुंब म्हणूनच चर्चेत आलं आहे.
पाकिस्तानातील मांगी कुटुंब. या कुटुंबात 9 जण राहतात. नऊही सदस्यांचं बर्थ डे एकाच दिवशी येतो. आता याला योगायोग म्हणा किंवा नियोजन म्हणा. पण त्याच्या या वेगळेपणामुळे या कुटुंबाचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झालं आहे. Weird Law : बायकोचा बर्थडे विसरणं कायद्याने गुन्हा; विश केलं नाहीत तर जेलमध्ये जाल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, हे पाकिस्तानी कुटुंब लारकाना इथं राहते. या कुटुंबात 9 लोक राहतात. वडील अमीर अली, आई खुदेजा, 7 मुले - सिंधू, अमीर, अंबर, जुळ्या बहिणी सासूई आणि सपना, जुळे भाऊ अम्मार आणि अहमर. या सर्व लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी 1 ऑगस्ट रोजी येतो. ही सर्व मुले 19 ते 30 वयोगटातील आहेत. आमिर आणि खुदेजाच्या पालकांसाठी 1 ऑगस्टची तारीख आणखी खास आहे , कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही याच दिवशी आहे. 1 ऑगस्ट 1991 रोजी त्यांचं लग्न झालं आणि बरोबर एक वर्षानंतर 1 ऑगस्ट 1992 रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचा जन्म झाला. सातही मुलांनी एकाच तारखेला जन्मलेल्या सर्वाधिक भावंडांचा किताब पटकावला आहे. यापूर्वी हा विक्रम अमेरिकेतील कमिन्स कुटुंबात 20 फेब्रुवारी 1952 ते 1966 दरम्यान जन्मलेल्या 5 मुलांच्या नावावर होता. OMG! केक खाताच पडले महिलेचे सर्व दात; पण कसं काय? पाहा VIRAL VIDEO सर्व मुलं नैसर्गिकरीत्या गरोदर राहिली आणि त्यांचा जन्मही नैसर्गिकच आहे म्हणजे कोणीही ऑपरेशनपूर्वी किंवा नंतर किंवा वेळेनंतर जन्माला आलं नाही. पती-पत्नीने सांगितले की त्यांनी असं काही प्लॅन केलं नव्हतं. आमिरनं सांगितलं की, 1 ऑगस्ट रोजी जेव्हा त्याच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला होता आणि आनंदीही होता. एकाच तारखेला एकामागून एक सर्व मुलं जन्माला आल्यानं दोघांनाही आनंद झाला. त्यांना वाटतं, की ही सर्वशक्तिमानाची भेट आहे जी त्यांना त्यांच्या वाढदिवशी मिळाली आहे. त्याच दिवशी त्याच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्यानुसार, एकाच तारखेला जास्तीत जास्त जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. कुटुंब आता 1 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत आहे.