नवी दिल्ली, 10 जून : केक एकदम स्पंजसारखा सॉफ्ट, क्रिमी असा असतो. दात नसलेली व्यक्तीही केक खाऊ शकते इतका तो नरम असतो. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एका महिलेचे दात मात्र असा केक खातानाच पडले. केक तिने तोंडात घेतला आणि तिचे सर्वच्या सर्व दात तोंडातून बाहेर आले. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. महिलेचा बर्थडे होता. तिच्या कुटुंबाने तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला. महिलेने आधी हातांनी केकची चव घेतली. त्यानंतर ती आपलं तोंड त्या केकवर लावायला गेली. तिने केकला तोंड लावला आणि तोच तिच्या तोंडातून सर्व दात बाहेर आले. हे दृश्य कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला कॅमेऱ्यात दिसते आहे. तिच्या आजूबाजूला काही लोक आहेत. महिला खूप आनंदात दिसते आहे. ती बोटांनी केकवरील क्रिम घेते आणि आपल्या आजूबाजूला असलेल्यांना चाखायला सांगते. पण ते लोक नकार देतात. तेव्हा महिला स्वतःच बोटांनी तो केक चाखते. थोड्यावेळाने ती खाली वाकते आणि तोंडांनी केकचा बाईट घ्यायला जाते. जसं तिचं तोंड केकला लागतं, तिचे दात पडतात. चर्चा तर होणारच! कुत्र्याच्या बर्थडेला 11 किलोचा केक, रिटर्न गिफ्ट फ्रिज; भारतात झालं जंगी सेलिब्रेशन यानंतर सर्वजण हसू लागतात. महिलेलाही लाज वाटते. ती शरमेने आपलं तोंड झाकते. पण असं काही घडल्यावर तिलाही हसू आवरत नाही. तीसुद्धा मोठ्याने हसताना दिसते. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल महिलेच्या तोंडातून बाहेर पडलेले हे दात खरे नाही आहेत. तर ते खोटे आहेत. तिने दातांची कवळी लावली होती. त्यामुळे जसा ती केक खायला जाते, तिच्या तोंडातील कवळी त्या केकला चिकटून राहते आणि तिच्या तोंडातून निघते. VIDEO - बर्थडे आहे चोराचा! पोलिसांनीही केलं हटके विश; दिलं जबरदस्त ‘गिफ्ट’ @cctv_idiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
Wait for it 😂pic.twitter.com/bqXNyu4kN9
— CCTV_IDIOTS (@cctv_idiots) June 9, 2023
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.