सामोआ, 02 जुलै : लग्नाचा आणि बायकोचा वाढदिवस विसरणं म्हणजे नवऱ्यांसाठी कोणत्या संकटापेक्षा कमी नसतं. त्यानंतर काय परिणाम भोगावे लागतात हे त्यांनाच माहिती. बायको रागावते, चिडते, भांडते, अबोला धरते. काही बायका तर आपल्या नवऱ्यांना जेवणही देत नाही, तर काही तर अगदी नातंच तोडण्याची टोकाची भूमिकाही घेतात. पण बायकोचा बर्थ डे विसरलात तर यापेक्षाही भयंकर परिणाम भोगावा लागू शकतो. थेट जेलमध्येच रवानगी होऊ शकते. सामोआमध्ये हा विचित्र कायदा आहे. सामोआ हे प्रशांत महासागरातील एक सुंदर असं आयलँड आहे. पण बेजबाबदार पतींसाठी हे आयलँड म्हणजे नरकापेक्षा कमी नाही. इथं छोट्या छोट्या चुकांसाठीही पतींना कठोर शिक्षा मिळते. इथं पती चुकूनही पत्नीचा बर्थडे विसरला तर त्याला शिक्षा म्हणून तुरुंगाची गवा खावी लागू शकते. Weird law - रात्री Toilet वापरावर सरकारने घातली बंदी; टॉयलेटमधून पाण्याचा आवाज आला तरी शिक्षा सामोआतील कायद्यानुसार नवरा चुकून बायरोचा बर्थ विसरला तर हा गुन्हा ठरतो. पत्नीने जर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली तर त्याला गजाआड केलं जातं. पण पतीला घाबरण्याची तशी गरज नाही. कारण पतींना त्यांची चूक सुधारण्याचाही मार्ग यात आहे. पहिल्यांदा बायकोचा बर्थ डे विसरल्यावर पोलीस त्याला पुन्हा अशी चूक करू नये, अशी तंबी देतात. पण त्यानंतर दुसऱ्यांदाचाही बायकोचा बर्थडे विसरला तर मग त्याचं काही खरं नाही. त्याला शिक्षा म्हणून तुरुंगात डांबलं जातं. या विचित्र कायद्याबाबत अनेकजण टीका करत असून वाढदिवस विसरण्यासारख्या किरकोळ बाबीसाठी तुरुंगवासाची शिक्षा कशी काय होऊ शकते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. एखादा कायदा मूळ कसा आहे, ते विसरून जेव्हा त्याचे वाट्टेल ते अर्थ लावले जातात, तेव्हा काय होतं, हे या कायद्यातून दिसून येत असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. वकील काळ्या आणि सफेद रंगाचे कपडे घालतात, कारण…. काही वर्षांपूर्वी एका पत्नीने आपल्या पतीला मोबाईलवरून दुसऱ्या महिलेसोबत चॅट करताना पाहिलं होतं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यातून निराश होऊन महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं होतं. या घटनेची देशात जोरदार चर्चा झाली होती आणि पती-पत्नी संबंधांबाबत चर्चाही झडली होती. याच वेळी एक कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार पतीनं पत्नीकडं दुर्लक्ष करणं, हा गुन्हा असल्याचं म्हणण्यात आलं होतं. मात्र या मूळ कायद्याचा विपर्यास आणि थट्टा होत होत त्याचा संबंध वाढदिवस लक्षात ठेवण्याशी जोडण्यात आला, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.