बाईकला आग
नवी दिल्ली, 26 एप्रिल : बाईक असो वा स्कूटी कित्येक तरुण या गाड्यांसोबत जीवघेणे खेळ करताना दिसतात. बाईक स्टंटचे असे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. बाईकसोबत खेळ करताना भयंकर घटना घडली. स्कूटीचा टायर दगडावर घासला आणि बाईक क्षणात पेटली. बाईकचा इतका भयंकर व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला नसेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक बाईक उभी आहे. बाईकच्या अवस्थेवरून ती जुनी असावी असं दिसतं. स्कूटीच्या आजूबाजूला बरेच तरुण आहेत. एका तरुणाने बाईकचं हँडल हातात धरलं आहे. बाईकचं मागील चाक एका दगडावर आहे. तरुण बाईक हाताने हलवून तिचं मागील चाक दगडावर घासतो. तशी त्या चाकाघालून आग बाहेर पडताना दिसते.
तरुणांना ते पाहून मजा येते. म्हणून ती आणखी खेळ करण्याचा प्रयत्न करतात. एक तरुण स्कूटीजवळ एक कॅन घेऊन येतो. या कॅनमध्ये कदाचित पेट्रोल आहे. तो बाईकच्या टाकीत पेट्रोल ओततो. त्यानंतर ते कॅनच हातात घेऊन खाली वाकतो आणि आग अधिक भडकवण्यासाठी म्हणून त्या आगीवर पेट्रोल ओततो. तेव्हा आग भडकते. क्षणात पूर्ण बाईकला आग लागते. OMG! राजकुमारची 18 लाखांची आलिशान गाडी गाढवांनी ‘पळवली’; नेमकं प्रकरण काय पाहा VIDEO स्कूटी आगीचा गोळा बनते. त्याचवेळी तरुणही त्या बाईकजवळ असतात. त्यांच्यावरही हा आगीचा भडका उडाल्याचं दिसतं. या व्हिडीओत त्या तरुणांंचं काय झालं ते दिसत नाही. पण आगीचं रूप पाहता नक्कीच ते गंभीररित्या भाजले असतील, हे नक्की. तरुणांना जुन्या बाईकचा टायर पेटवायचा होता पण पूर्ण बाईकच पेटली. @NoContextHumans नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
त्यामुळे कृपया तुम्ही गाड्यांसोबत असे जीवघेणे स्टंट, खेळ करू नका, इतकंच तुम्हा सर्वांना आवाहन.