JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, वाचा 'हाथी काका'ची कथा

मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, वाचा 'हाथी काका'ची कथा

अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर (Man Gives Entire Property to His Elephants) केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 मार्च : अनेकदा असं घडतं की आपली जवळची माणसं आपली साथ सोडतात, मात्र एकदा जीव लावला की पाळीव प्राणी मात्र शेवटपर्यंत साथ देतात. याच गोष्टीचं आणखी एक उदाहरण आता समोर आलं आहे. ही उदाहरण आहे पटनाजवळील दानापूरच्या जानीपूर परिसरात राहाणाऱ्या अख्तर इमाम यांचं. त्यांना आसपासचे लोक हाथी काका (Elephant Uncle) या नावानंच ओळखतात. या नावाची कथाही अतिशय रंजक आहे. अख्तर यांनी आपल्या मुलाला जमीन आणि संपत्तीतून बेदखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्याकडे असणाऱ्या दोन हत्तींच्या नावावर (Man Gives Entire Property to His Elephants) केली आहे. मुलाला बेदखल करुन आता नऊ महिने झाले आहेत, मात्र अख्तर यांना कधीच एकटं असल्यासारखं वाटत नाही. याचं कारण आहे, मुलापेक्षा जास्त हत्तींवर असणारा त्यांचा विश्वास. याच कारणामुळं लोक त्यांना हाथी काका म्हणतात. अख्तर यांच्याकडे दोन हत्ती आहेत. एकाचं नाव राणी तर दुसऱ्याचं नाव मोती आहे. अख्तर यांचा संपूर्ण दिवस याच दोघांसोबत जातो. आपली पाच कोटीची जमीन हत्तींच्या नावावर केल्यानंतर अख्तर प्रसिद्धी झोतात आले होते. त्यांनी आपल्या संपत्तीचं विभाजन दोन भागात केलं आहे. पहिला हिस्सा त्यांनी पत्नीच्या नावावर केला आहे. तर, दुसऱ्या हिस्सा हत्तींच्या नावावर. हाथी काका म्हणतात, की उद्या मी राहिलो नाही तर माझं घर, बँक बॅलन्स, जमीन आणि सगळी संपत्ती हत्तींची होईल. हत्तींना काही झाल्यास त्यांच्या वाट्याची संपत्ती ऐरावत संस्थेला मिळेल. त्यांचं म्हणणं आहे, की त्यांचं जीवन हत्तींनाच समर्पित आहे. हे हत्तीदेखील त्यांच्यासाठी एखाद्या जोडीदारापेक्षा कमी नाहीत. अख्तर यांना आपल्या एकुलत्या एका मुलाला संपत्तीतून बेदखल केल्याचं जराही दुःख नाही. त्यांनी सांगितलं, की त्यांचा मुलगा मिराज उर्फ पिंटू नालायक निघाला. त्यानं मला आपल्या प्रेयसीच्या बलात्कार प्रकरणात खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. यामुळं मला तुरुंगातही जावं लागलं होतं. तपासादरम्यान हे आरोप खोटे सिद्ध झाले आणि माझी सुटका झाली. मुलानं माझ्या हत्तींना मारण्याचाही प्रयत्न केला मात्र तो पकडला गेला. यानंतर मी हत्तींच्या नावावर संपत्ती करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं. अख्तर यांनी सांगितलं, की एकदा दोन लोक हत्यारं घेऊन त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी हत्तींनीच मोठमोठ्यानं आवाज करत आसपासच्या लोकांना उठवलं. हा आवाज ऐकून हत्यारं घेऊन आलेल्या दोघांनी पळ काढला आणि माझा जीव वाचवला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या