प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 21 जुलै : एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे प्रकरण अखेर एका कन्डोमच्या पॅकेटमुळे सोडवण्यात आले आहे. त्यामुळे या दोषीला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषींना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सुनावण्यापूर्वी तरुण जामिनावर बाहेर होता. आता पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पीडितेच्या आईने बाथरुममध्ये सापडलेल्या कंडोममुळे तिला मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली. आईला हे समजले नसते तर त्या मुलीला आईला आपला त्रास सांगता देखील आला नसता आणि ही घटना समोर आली नसती. पण अखेर हा प्रकार उघड झालाच. Crime News : अनेक दिवसांपासून रखडलेली मर्डर केस एका Condom मुळे सॉल्व मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 सप्टेंबर 2021 ची आहे. धीरज लोधियाल हा दोषी तरुण घटनेच्या वेळी अल्पवयीन होता. त्यावेळी पीडितेचे वय 14 वर्षे होते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने तरुणीशी मैत्री केली. घटनेच्या दिवशी धीरजने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि दोघेही शहरातील एका मॉलमध्ये भेटले. मुलीचा वाढदिवस येणार होता, त्यामुळे धीरजने तिला हजार रुपये किमतीचा ड्रेस भेट दिला. एक दिवस मुलीच्या घरी कोणीच नव्हते. तिची आई रुद्रपूरला गेली होती. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर धीरज मुलीला घेऊन तिच्या घरी गेला आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची आई घरी पोहोचली तेव्हा तिला बाथरूममध्ये वापरलेला कंडोम सापडला. जेव्हा आईने याबद्दल पिडितेला विचारले तेव्हा तिने सर्व प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने कंडोम घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सरकारी वकील नवीनचंद्र जोशी यांनी सांगितले की, पीडितेच्या आईने धीरजविरुद्ध तिच्या मुलीला फूस लावून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे कंडोम एफएसएलकडे पाठवण्यात आले असून तपास अहवाल तरुणाविरुद्ध आला आहे. या प्रकरणात 7 साक्षीदार आणि फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यात आला. त्याआधारे धीरजचा गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्याला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.