JOIN US
मराठी बातम्या / Viral / पिल्लाच्या मृत्यूनंतर आई हत्तीणीने असं काही केलं की, VIRAL VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

पिल्लाच्या मृत्यूनंतर आई हत्तीणीने असं काही केलं की, VIRAL VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

काळीज पिळवटून टाकणारा हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जून : माणूस असो वा प्राणी त्यांच्यात एक साम्य असतं ते म्हणजे आईचं प्रेम. माणसांप्रमाणे प्राण्यांचाही जीव त्यांच्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. पिल्लांना काहीही झालं तरी ते त्यांच्यासाठी धडपड करताना दिसतात. असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका हत्तीणीच्या पिल्लाचा मृत्यू झाला, त्यानंतर हत्तीणीने जे केलं ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय वनसेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पिल्लू मेलं पण आईने हार मानली नाही. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीचं एक पिल्लू कळपातून भरकटलं होतं. तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही हत्तीणीने आपल्या पिल्लाला सोडलं नाही. आपलं पिल्लू मृत झाला हे मानण्यास आई तयारच नाही. मृत पिल्लाला ती दोन किलोमीटपर्यंत घेऊन गेली. त्यानंतर त्याला एका पाण्यात नेलं. तिथं ती त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करू लागली. सांगा पाहू कोण आहे हा प्राणी? योग्य उत्तर देणाऱ्याला मिळणार बक्षीस व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन हत्ती एका नदीत दिसत आहेत. तिथं नदीत एक छोटं पिल्लू पडलेलं दिसतं आहे. तोच तो मृत हत्ती आहे. आई हत्ती आपल्या पिल्लाला साद घालते आहे. कधी पायाने तर कधी सोंडेने हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मृत पिल्लाला जिवंत करण्यासाठी धडपडत होती. पण पिल्लू काहीच प्रतिक्रिया देत नाही, पिल्लात काहीच हालचाल दिसत नाही हे पाहून तिचा जीव कासावीस होतो. तिची तगमग तिच्या कृतीतून स्पष्ट दिसते. शेवटपर्यंत ती पिल्ला जिवंत करण्यासाठी प्रयत्न करत राहते. साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO @susantananda3 ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ.

संबंधित बातम्या

आसामच्या गोेश्वरमधील ही घटना. पिल्लाला जिवंत करण्याची हत्तीणीची धडपड पाहून आपल्याही काळजाचं पाणी पाणी होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या