बाळाला गरम दुधाने अंघोळ (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
लखनऊ, 28 जून : बाळांना दुधाने अंघोळ घातल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण सध्या असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घातली जात आहे. बाळ तडफडत होतं, मोठमोठ्याने रडत होतं. पण कुणालाही पाझर फुटला नाही. सर्वांच्या समोर बाळावर उकळतं दूध टाकण्यात आलं पण तरी सर्वजण तिथं उभं राहून तमाशा पाहत राहिले. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे. धार्मिक प्रथा, परंपरेच्या नावाने लोक काय काय नाही करत. अशीच ही यूपीतील घटना, ज्यात बाळाला उकळत्या दुधाने अंघोळ घालण्यात आली आहे. बलिया जिल्ह्यातील श्रवणपूर गावातील ही भयंकर घटना असल्याचं सांगितंल जातं आहे. एका व्यक्तीने चिमुकल्या जीवाला दुधाने अंघोळ घातली आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीने एका बाळाला हातात घेतलं आहे आणि त्याला नाचवताना दिसतो आहे. डोळे आणि हृदय काढले, कैद्यांनी जेलरला खाऊ घातले, जगातील धोकादायक जेल तिथंच काही भांड्यांमध्ये दूध उकळताना दिसत आहे. त्यातून वाफा बाहेर पडताना दिसत आहे. यावरून ते दूध किती गरम आहे, याचा अंदाज येतो. या भांड्यांजवळ नेत ती व्यक्ती त्या मुलाला आपल्या पायाच्या गुडघ्यावर बसवते. एका हातात त्या बाळाला धरते आणि दुसरा हात दुधाच्या भांड्यात टाकून ते दूध त्या चिमुकल्याच्या अंगाला लावताना दिसते. प्रेम एवढं क्रूर असतं का? लेकानेच दिली आईची सुपारी; कारण वाचून बसेल धक्का लहान बाळाला वेदना होत आहेत. ते मोठमोठ्याने ओरडत आहे. तिथं आजूबाजूला बरेच लोक आहेत. बाळाचं रडणं, त्याला होत असलेल्या वेदना ते स्पष्टपणे पाहत आहेत. पण तडफडणाऱ्या बाळाला पाहून कुणालाही पाझर फुटला नाही. कुणीही त्या बाळाला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही. उलट पुजाऱ्याचीच वाह वाह करत राहिले.
माहितीनुसार व्हिडीओत बाळासोबत हे धक्कादायक कृत्य करताना दिसलेला साधू हा वाराणसीतील पुजारी आहे. पंडित अनिल भगत म्हणून तो ओळखला जातो.