JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजी-आजोबांची प्यारवाली लव्हस्टोरी; वाचून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजी-आजोबांची प्यारवाली लव्हस्टोरी; वाचून तुम्हीही म्हणाल, सो क्यूट !

सोशल मीडियावर व्हायरल झालेला ‘बाबा का ढाबा’ जोमात सुरू आहे. बाबा का ढाबा चालवणाऱ्या या आजी-आजोबांची लव्हस्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियावर नेहमीच मीम्स, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे फक्त टाईमपासचं साधन नाही, अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या समोर समोर येतात. लोकांची दु:ख, त्यांच्या अडचणी सोशल मीडियाच्याच माध्यमातून सगळ्या जगापर्यंत पोहोचतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘बाबा का ढाबा’ ही पोस्ट हिट झाली होती. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये कांताप्रसाद नावाचे आजोबा जेवणाचं छोटसं दुकान चालवतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण लॉकडाऊनमुळे आजोबा आर्थिक संकटात सापडले होते. सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट शेअर केल्यानंतर ‘बाबा का ढाबा’समोर लोकांनी अक्षरक्ष: रांगा लावल्या. त्यांचा व्यवसाय आता जोमात चालायला लागला आहे. आर्थिक संकटात असलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावर आता हसू फुललं आहे. या आजी-आजोबांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

सुपरहिट आजोबांची सुपरहिट लव्हस्टोरी ‘बाबा का ढाबा’ मधल्या आजोबांची लव्हस्टोरी देखील सुपरहिट आहे बरं का. या आजोबांच्या पत्नीचं नाव बदामी आहे. कांतीप्रसाद आणि बदामी यांचा बालविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी या आजोबांचं वय 5 वर्ष होतं तर आजी फक्त 3 वर्षाच्या होत्या. उत्तरप्रदेशातील आझमगड हे त्यांचं मुळ गाव. पुढे कामानिमित्त कांतीप्रसाद दिल्लीला स्थायिक झाले. दिल्लीला आल्यावर आजोबांनी फळं विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी चहाची टपरी टाकली. असे छोटे मोठे व्यवसाय करत 1990 साली आजोबांनी बाबा का ढाबा हे छोटसं दुकानं थाटलं. कांतीप्रसाद यांच्या प्रत्येक व्यवसायामध्ये बदामी आजींनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. अनेक वर्ष दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. कितीही कठीण प्रसंगामध्ये एकमेकांची सोबत सोडायची नाही, हा आजी-आजोबांचा निर्धार आजच्या तरुण पिढीनेही शिकण्यासारखा आहे. अशी आहे कांतीप्रसाद आणि बदामी यांची क्यूट लव्ह स्टोरी. या लव्हस्टोरीमध्ये व्हिलन नाही, नाट्यमय ट्विस्ट नाहीत. पण ही लव्हस्टोरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या