JOIN US
मराठी बातम्या / Viral / चहाच्या टपरीने तरुणाचं नशीब पालटलं, महिन्याला कमावतो 50 हजार रुपये!

चहाच्या टपरीने तरुणाचं नशीब पालटलं, महिन्याला कमावतो 50 हजार रुपये!

चहाच्या टपरीने तरुणाचं नशीब पालटलं आहे. महिन्याला तो 50 हजार रुपयांची कमाई करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रामकुमार नायक, प्रतिनिधी महासमुंद, 5 जून : देशात आज चहाचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय. याचं प्रमुख कारण म्हणजे या व्यवसायात छोट्या गंतवणुकीतून मोठा नफा मिळतो. आज ‘अमृततुल्य’ चहा दुकानाच्या व्यवसायातून अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत. छत्तीसगडच्या महासमुंद भागातील एका तरुणानेही या चहाची फ्रँचायझी घेऊन ‘आयुष अमृततुल्य’ नावाचं दुकान सुरू केलं आहे. रायपूरहून महासमुंदला जाणाऱ्या रस्त्यावर हे दुकान असून आज येथे दूर-दूरहून लोक चहा प्यायला येतात. नेतेमंडळीही या दुकानावर हजेरी लावतात. असं काय खास आहे या चहामध्ये? जाणून घेऊया. महासमुंदचा रहिवासी असलेल्या मोहम्मद मंसूर या तरुणाने सुरू केलेल्या या दुकानाचं नाव ‘आयुष अमृततुल्य’ असं आहे. येथे चॉकोलेट चहा, मसाला चहा, गुळाचा चहा यांसारखा तब्बल 12 प्रकारचा चहा मिळतो. त्यांपैकी गुळाच्या चहाला जोरदार मागणी आहे. हा चहा चवीला सुरेख आणि पचायला हलका असतो. ज्यांना साखर आवडत नाही, ते गुळाचा चहा घेतात. चहासह या दुकानात हॉट कॉफी आणि केसर-पिस्ता दूधही मिळतं. विशेष म्हणजे येथे शुगर फ्री चहादेखील उपलब्ध असतो.

अनेक तरुणमंडळी या दुकानाबाहेर गप्पा मारताना दिसतात, तर संध्याकाळच्या वेळी याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. खिशाला परवडणारे चहाचे वेगवेगळे प्रकार येथे मिळत असल्याने या दुकानाला ग्राहकांची मोठी पसंती आहे. Skin Care : दररोज फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर येईल तेज, चमकदार चेहऱ्यासाठी या टिप्स फॉलो करा दरम्यान, मोहम्मदचा चहाचा पहिलावहिला व्यवसाय सध्या जोरदार सुरू असून व्यवसायासाठीचा संपूर्ण खर्च भागवून महिन्याला 40 ते 50 हजार रुपये इतकी त्याची कमाई आहे. आता हा व्यवसाय आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात तो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या