JOIN US
मराठी बातम्या / Viral / असा हत्ती तुम्ही पाहिलाच नसेल; दुर्मिळ हत्तीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान VIDEO

असा हत्ती तुम्ही पाहिलाच नसेल; दुर्मिळ हत्तीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान VIDEO

भारतीय वनसेवा अधिकाऱ्यांनी असे हत्ती पाहायला मिळणं खूप दुर्मिळ असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

दुर्मिळ हत्तींचा व्हिडीओ.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 मार्च : हत्तीं चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. अशाच हत्तींचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. पण यातील हत्ती खास आहेत. हे हत्ती दुर्मिळ असल्याचं सांगितलं जातं आहे. तुम्हीसुद्धा याआधी असे हत्ती पाहिलेच नसतील. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हत्तीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर छोटे हत्ती दिसत आहेत. हत्तीचे दोन पिल्लू आहेत. त्यांच्यामागे एक हत्तीण आहे. हत्तीण आपल्या दोन पिल्लांसह रस्ता ओलांडते आहेत. हे हत्ती दुर्मिळ असल्याचं आणि त्यांचा हा व्हिडीओही दुर्मिळ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. Pink elephant video : अद्भुत! कॅमेऱ्यात कैद झाला गुलाबी हत्ती; कधीच पाहिला नसेल असा दुर्मिळ VIDEO आता तसं पाहिलं तर हे हत्ती इतर हत्तींप्रमाणेच दिसत आहे. मग यांच्यात इतकं काय खास आहे, की त्यांना दुर्मिळ म्हटलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  या हत्तीमध्ये नेमकं काय खास आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.

तुम्ही हत्तींचे इतर व्हिडीओ नीट पाहिले असतील तर सामान्यपणे एका हत्तीसोबत नेहमी एकच पिल्लू दिसतं, कधीच दोन पिल्लं नसतात. पण या व्हिडीओत तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एका हत्तीसोबत दोन पिल्लं दिसतील, तेसुद्धा सारखेच आणि हेच या हत्तींना इतर हत्तींपासून वेगळं बनवतं. आता हे कसं काय? याचं उत्तरही अधिकाऱ्याने आपल्या या ट्विटर पोस्टमध्ये दिलं आहे. सुशांत नंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीओत दिसत असलेल्या हत्तीणीची पिल्लं ही जुळी आहेत. जगात जितक्या हत्तींचा जन्म होतो, त्यापैकी एक टक्क्यांपेक्षाही कमी जुळी पिल्लं आहेत. त्यामुळे हे दृश्य अविश्वसनीय आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पूर्वोत्तर भारतातील आहे, असंही त्यांनी सांगितलं. India’s Tallest Elephant : बापरे बाप! नजर पोहोचेपर्यंत लचकेल मान; सर्वात उंच हत्ती तुम्ही पाहिलात का?

हत्तीणीने जुळ्या पिल्लांना जन्म देण्याची शक्यता एक टक्क्यांपेक्षाही कमी ्सते. जर जुळी पिल्लं जन्माला आली तरी दोन्ही पिल्लांची जगण्याची शक्यताही खूप कमी असते. जुळी पिल्लं जगली तरी ती खूप कमजोर असतात.  फक्त आशिया, आफ्रिकेत अशी काही प्रकरणं आहेत, ज्यात जुळे हत्ती जन्माला आले आणि दोन्ही जिवंत, मजबूत आहेत. अमेरिका, युरोपमध्येही कोणत्या देशात जुळे हत्ती जगल्याचं कोणतं प्रकरण समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत पहिल्यांदाच हत्तींच्या जुळ्या पिल्लांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांची जगभर चर्चा झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या