JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - दूर पळून नाही तर शिकाऱ्याजवळ जाऊन वाचवला स्वतःचा जीव; हरणाची नवी शक्कल पाहून शिकारीही थक्क

VIDEO - दूर पळून नाही तर शिकाऱ्याजवळ जाऊन वाचवला स्वतःचा जीव; हरणाची नवी शक्कल पाहून शिकारीही थक्क

शिकाऱ्याला पाहिलं ही हरिण आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळतात. पण या हरणाने मात्र उलटंच केलं आणि त्यानंतर जे घडलं ते आश्चर्यचकीत करणारं आहे.

जाहिरात

जीव वाचवण्यासाठी हरणाची नवी आयडिया.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी : सामान्यपणे माणूस असो वा प्राणी -पक्षी… आपल्याला एखाद्या गोष्टीपासून धोका आहे, असं समजताच सर्वजण त्या संकटापासून दूर पळतात. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांच्या शिकारी चे तुम्ही असे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. ज्यात वाघ, सिंह, बिबट्या असे खतरनाक प्राणी शिकार करायला आल्यावर हरणा सारखे कमी शक्तिशाली प्राणी त्यांच्यापासून दूर पळतात. त्यांची चाहूल लागताच ते वाऱ्याच्या वेगाने सुसाट पळत सुटतात. पण सध्या शिकारीचे असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका हरणाने शिकाऱ्यापासून दूर पळून नाही तर चक्क त्याच्या जवळ जाऊन आपला जीव वाचवला आहे. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल, हे कसं काय शक्य आहे? असं तुम्ही म्हणाल. नेमकं या हरणाने काय आणि कसं केलं ते पाहुयात. म्हणतात ना संकटापासून आपण जितकं दूर पळू तितकं संकट आपल्यामागे येतं. उलट त्या संकटाशी सामना करूनच आपण त्या संकटावर मात करू शकतो. कदाचित हेच या हरणाला समजलं असावं. त्यामुळे एरवी शिकाऱ्याला पाहून धूम ठोकणारं हे भित्रं हरिण यावेळी मात्र स्वतःच शिकाऱ्याजवळ आलं. आणि मग काय त्याच्या या हिमतीने चमत्कारच करून दाखवला. हे वाचा -  अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका जंगलातील हा व्हिडीओ आहे. एक शिकारी शिकार करायला आला आहे. त्याला समोर एक शांत बसलेलं हरिण दिसतं. शिकाऱ्याने आपल्या बंदुकीचा नेम त्याच्यावर धरलेला असतो. हरणाचं लक्षही शिकाऱ्याकडे जातं, तसा तो घाईघाईत उठून उभा राहतो. आता खऱंतर या हरणाने आपल्या जीव वाचवण्यासाठी पळणं अपेक्षित होतं. पण उलटच घडतं.

ते हरिण शिकाऱ्यापासून दूर पळण्याऐवजी त्याच्या जवळच येतं. अगदी त्याच्या बंदुकीसमोर येऊन उभं राहतो. शिकाऱ्यासमोर छाती ताणून बिनधास्तपणे उभं राहून बघुया तू काय करतो, मला मारूनच दाखव, असं चॅलेंजच जणू या हरणाने शिकाऱ्याला दिलं. हे वाचा -  पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीच्या जबड्यात गेली आई; मन हेलावणारा VIDEO हरणाचं हे असं रूप पाहून शिकारीही आश्चर्यचकीत झाला. त्याला या हरणाची दयाही आली आणि त्याने त्याच्या हिमतीची दादही दिली. ज्या हरणावर त्याने काही वेळापूर्वी बंदूक रोखून धरली होती तीच बंदूक त्याने खाली केली आणि हरणाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. भित्र्या हरणाने दाखवलेल्या हिमतीने शिकाऱ्याचंही मन बदललं. अशी नवी शक्कल लढवत हरणाने स्वतःचा जीव वाचवला आहे.

संबंधित बातम्या

आयपीएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या