मुंबई, 08 एप्रिल : माणूस असो किंवा पशूपक्षी. त्यांच्यातील आईची (mother) ममता ही सारखीच. माणसांमध्ये महिला म्हणून भले तिला कुणी कितीही नाजूक, कमजोर, सौम्य हृदयाची म्हटलं तरी आई म्हणून जेव्हा तिच्या मुलांवर संकट येतं तेव्हा ती संपूर्ण जगाशी लढते, कुणावरही ती भारी पडू शकते. भले यावेळी तिचा जीव गेला तरी चालेल. मुक्या जीवांमध्येही अगदी तसंच. जेव्हा त्यांच्या पिल्लांवर संकट येतं तेव्हा आपल्यापेक्षा बलाढ्या, शक्तिशाली प्राण्यांशीही ते लढू शकता किंवा आपला जीव त्यांच्यासमोर देऊन आपल्या पिल्लांचा जीव वाचवतात. अशाच एका हरणाचा (deer) व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. एका हरिणीनं आपल्या पाडसाचं जीव वाचवण्यासाठी काय केलं ते पाहाल तर तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी ती स्वतः मगरीच्या (crocodile) जबड्यात गेली. व्हिडीओत पाहू शकता. हरणाचं पाडस नदीत उड्या मारत दुडूदुडू पळत सुटतं. नदीत आपल्यासमोर मोठं संकट आहे, याची कल्पनाही त्याला नाही. त्याची आई त्याच्या मागे आहे. तिला आपल्या पिल्लावर येणाऱ्या संकटाची जाणीव होते आणि मग काय क्षणाचाही विलंब न करता ती धावत सुटते. पाडस ज्या नदीत धावत गेलं. त्या नदीतील मगर त्या पाडसाला पाहताच त्याच्या दिशेनं वेगानं येत असतं. हरिणीला हे दिसतं आणि ती पाण्यात धावत येते. तुम्ही पाहाल तर ती पिल्लाला अडवण्यासाठी किंवा त्याला बाजूला करण्यासाठी त्याच्याजवळ जात नाही किंवा त्याच्या मागेही धावत नाही. तर त्याच्यापासून दूर राहून त्याच्या बाजूनं धावण्याचा प्रयत्न करते. हे वाचा - VIDEO: 50 प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला करायला आला हत्ती, पाहा चालकाने काय केलं ती असं का करते याचं तुम्हाला थो़डं पुढे गेल्यावर कळेल. आपली आई आणि आपला शिकार करायला आलेली मगर आपल्या जवळ आहे, याची कल्पना त्या पाडलाही नाही. ते आपलं मस्त आपल्याच नादात खेळत जात असतं. आई पाडस आणि मगरीमध्ये एक भिंत बनून शांतपणे उभी राहते. पाडसाकडे एकटक पाहत राहते. पाडसापासून आता आपण दुरावणार याची कल्पना तिला असते. त्यामुळे त्याला ती शेवटचं पाहून घेते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असलेला भाव स्पष्टपणे दिसतो.
No words can describe the power, beauty and heroism of mother's love 🙏🏻
— Sonal Goel IAS 🇮🇳 (@sonalgoelias) April 6, 2022
Heartbreaking video of a mother deer sacrificing herself for saving her baby 😞
It reminds us to Never ignore your parents and family.
Respect them and take care of them when it's your turn 🙏🏻
(VC : SM ) pic.twitter.com/e8K9WQiqIc
काही क्षणात मगर त्या हरिणीला आपल्या जबड्यात घेतो. हरिण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही कारण तिनं मुद्दामहून आपला जीव धोक्यात टाकलेला आहे. जेणेकरून आपल्या पाडसाचा जीव वाचेल. पाडस सुखरूपपणे पाण्यातून बाहेर पडतं. हे वाचा - VIDEO - बापरे! थेट मगरीच्याच पाठीवर जाऊन बसला तरुण आणि…; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आईची ताकद, सौंदर्य आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द नाही. हृदयद्रावक व्हिडीओ. ज्यात हरणाने आपल्या पिल्लासाठी बलिदान दिलं आहे. कधीच आपल्या आई-वडिलांना आणि पालकांकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा त्यांच्या सन्मान करा, त्यांची काळजी घ्या.