आम्हाला जमलं नाही ते पुजाऱ्यांनी करून दाखवलं असंही तरुणमंडळी म्हणत आहेत.
रोहित भट्ट, प्रतिनिधी अल्मोडा, 28 जून : जुगारात किंवा कोणत्याही पैसे लावण्याच्या खेळात लाखो खेळाडूंचं नुकसान झाल्यानंतर काही थोडे थोडके खेळाडू मालामाल होतात. या खेळांमध्ये कितीही जोखीम असली तरी विजेत्यांचं मात्र नशीब पालटतं हे नक्की. इंडियन प्रीमियर लीग सुरू असताना उत्तराखंड राज्यातील अनेक तरुणांनीही ड्रीम 11 (Dream 11)वर मोठमोठी रक्कम कमावली. एक पुजारी तर चक्क करोडपती झाले आहेत. अल्मोडा जिल्ह्यातील पुजारी मोहन चंद्र भट्ट यांनी ड्रीम 11वर टीम बनवून एक कोटी रुपये जिंकले. ते सोमेश्वर भागातील बायला खालसाचे रहिवासी आहेत. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा आहे. आम्हाला जमलं नाही ते पुजाऱ्यांनी करून दाखवलं असंही तरुणमंडळी म्हणत आहेत.
मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जूनला झालेल्या श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड सामन्यात त्यांनी आपली टीम बनवली होती. त्यांच्या संघाने 1146 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं. पहिलं बक्षीस 1 कोटींचं होतं. आपण करोडपती झालोय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. लाखो खेळाडूंमधून आपला संघ पहिल्या स्थानावर आहे, हेदेखील त्यांना खरं वाटत नव्हतं. ‘तुला लाज कशी….’ बिकिनी…किस आणि बॉयफ्रेंडसोबतचा सुझान खानचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला मोहन यांच्या या यशाबाबत त्यांच्या घरात प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. शिवाय नातेवाईक आणि आजूबाजूच्या गावातील लोकही त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी येतात. दरम्यान, मोहन चंद्र भट्ट हे सोमेश्वरमधील गोलू देवता मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी हे यश म्हणजे बाबा बद्री विशाल आणि देवतेचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे.