मुंबई, 28 जून- एक काळ असा होता जेव्हा अॅक्शन बॉय हृतिक आणि इंटेरियर डिजायनर सुझेन यांची जोडी आयडियल मानली जात होती. आता ही जोडी एकमेंकापासून वेगळी झाली आहे. सुझान खान ही सध्या अर्सलन गोणी याला डेट करत आहे. आता त्या दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी आणि तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मेक्सिकोमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. “सूर्यकिरण, मजा-मस्ती आणि खूप आठवणी माझ्या आवडत्या लोकांबरोबर”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. सध्या तिच्या या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. वाचा- नवाजुद्दीन सिद्धिकीची बायको BB OTT 2 मधून आऊट; इविक्शनचं कारण ठरली पूजा भट्ट सुझान खानने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती मित्रांसोबत फूलटू मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. सुझाननं काळ्या रंगाची बिकीनी घातलेली दिसत आहे तर बॉयफ्रेंड अर्सल शर्टलेस दिसत आहे. दोघंही आपल्या मित्रांसोबत सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. तिनं या व्हिडिओत अर्सलला किस केल्याचे देखील दिसत आहे. तिच्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, “हृतिकच्या पैशावर हे दोन बेरोजगार मज्जा करत आहे”, तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, “हृतिकला सोडून याच्याबरोबर”, शिवाय एकानं म्हटलं आहे की, “तुला लाज कशी वाटत नाही? तुझी मुलं हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल”, अशी कमेंट एकाने केली आहे.
बॉलीवूडमधील एके काळीचं प्रसिद्ध जोडपं म्हणजे हृतिक रोशन आणि सुजैन खान.१३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून खरं तर चाहत्यांना धक्काच बसला होता.कारण या जोडप्याचा घटस्फोट चाहत्यांना अनपेक्षित होता.पण घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुजैन यांच्यात चांगली मैत्री आहे.