JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिलेनं मृत्यूनंतर मागे सोडली कोट्यवधींची संपती, पण कोणी घेऊ शकणार नाही अशी अट ठेवली समोर

महिलेनं मृत्यूनंतर मागे सोडली कोट्यवधींची संपती, पण कोणी घेऊ शकणार नाही अशी अट ठेवली समोर

कागदपत्रे शोधली असता, लक्षात आले की या महिलेची मालमत्ता घेणे इतके सोपे नाही, कारण तिने आपली संपत्ती देण्यासाठी अशी अट घातली आहे की पाहून त्यात आता न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून : कधी कधी काही लोक इतके हुशार असतात की त्यांच्या हुशारीला कोणतीही तोड नाही. ते जे विचार करतात, त्यांच्या डोक्याच्या पलिकडे तर कोणीच विचार करु शकत नाही. एक असंच प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्याबद्दल ज्याने ऐकलं तो आश्चर्यचकीत होत आहे. एका महिलेने तिच्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले आहे. तिने ज्याला स्पर्श केला ते सोन्याचे झाले, असं म्हणायला काहीही हरकत नाही. पण तिचा हाच वारसा सांभाळणारे कोणी नव्हते. ना कोणी मूल ना कोणी नातेवाईक. काही मित्र होते, पण महिलेने त्यांना आपले वारस बनवले नाही. नुकतेच वयाच्या ८४ व्या वर्षी या महिलेचे निधन झाले तेव्हा घर आणि इतर मालमत्तेच्या वारसांचा शोध सुरू झाला. मासे पकडण्यासाठी चिमुकल्याचा अजब जुगाड, Video पाहून नेटकरी कौतुक करताना थकत नाहीत कागदपत्रे शोधली असता, लक्षात आले की या महिलेची मालमत्ता घेणे इतके सोपे नाही, कारण तिने आपली संपत्ती देण्यासाठी अशी अट घातली आहे की पाहून त्यात आता न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. टँपा बे टाईम्सच्या वृत्तानुसार, फ्लोरिडा येथील रहिवासी नॅन्सी सॉयर यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. तिने एक वाडा आणि 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपयांची सर्व मालमत्ता सोडली आहे. यासाठी या महिलेनं एक वारसाहक्क पेपर सोडला आहे. Viral Video : ना वय पाहिलं, ना लाज बाळगली; महिलांच्या गर्दीच आजी उठून थेट नाचली… हा डान्स एकदा पाहाच या वारसा हक्कात या महिलेनं एक अट घातली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की तिच्या 7 मांजरींचा सांभाळ कोण करेल. ही मालमत्ता त्यांनाच देण्यात यावी. क्लियोपात्रा, गोल्डफिंगर, लिओ, मिडनाईट, नेपोलियन, स्नोबॉल आणि स्क्वकी नावाच्या त्याच्या पर्शियन मांजरींना आयुष्यभर प्रशस्त टँपा निवासस्थानी ठेवायचे, असेही त्यात लिहिले आहे. कारण दुस-या कुठल्यातरी घरी गेल्यावर त्या अस्वस्थ होतील. पणा आता परिस्थिती अशी आहे की, घरात एकच मांजर असेपर्यंत हे घर कोणीही विकत घेऊ शकत नाही. नॅन्सीची मैत्रिण याना अल्बानने सांगितले की, तिला तिच्या मांजरी खूप आवडतात. म्हणूनच शेवटची मांजर मरत नाही तोपर्यंत घर विकले जाणार नाही, असे तिने वारसाहक्कात स्पष्टपणे लिहिले आहे. शेरी सिल्क, ह्युमन सोसायटी ऑफ टँपा बेचे कार्यकारी संचालक म्हणाले की, सॉयरने मांजरींचा आयुष्यभराचा खर्च देखील बाजूला ठेवला आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. सॉयर यांनी मांजरींचे अन्न, औषध आणि काळजी यासाठी वेगळा निधी ठेवला आहे. पण आता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी आदेश दिले आहेत की एवढ्या मोठ्या घरात आपण मांजरींना एकटं सोडू शकत नाही त्यामुळे त्यांना दुसरं कुठेतरी शिफ्ट करण्यात यावं. आता या आठवड्यात मांजरी दत्तक घेतल्या जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या