स्मारकावर कुत्र्याचा फोटो कोरलेला आहे.
मेघाराम मेघवाल, प्रतिनिधी जालोर, 23 जून : आपण आतापर्यंत घरातच कुत्र्यासाठी एक लहानसं घर केल्याचं पाहिलंय. कुत्र्याचा वाढदिवस साजरा केल्याचंही पाहिलंय. कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिथे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचंही आपण पाहिलंय. परंतु आपण कधी कुत्र्याच्या आठवणीत त्याचं स्मारक उभारल्याचं पाहिलंय किंवा ऐकलंय का? अहो…विचार कसला करताय, असं चक्क घडलंय. राजस्थानच्या परतिलोडा-दादाल मार्गावर चक्क कुत्र्याचं स्मारक आहे. बरं हे सर्व कुत्र्यांना समर्पित असं सार्वजनिक स्मारक नाहीये हा. तर केवळ एकाच कुत्र्यासाठी उभारलेलं हे खास स्मारक आहे. त्यावर कुत्र्याचा फोटो दगडात कोरलेला देखील आहे. खरंतर हे स्मारक का उभारण्यात आलं, यामागे एक गोष्ट आहे. ती नेमकी काय, जाणून घेऊया.
अनेक वर्षांपूर्वी तिलोडाच्या वाचलडाई क्षेत्रात विविध वन्यजीवांचं वास्तव्य होतं. या वन्यजीवांच्या शिकारीसाठी हौशी मंडळी कायम याठिकाणी यायची. आजूबाजूच्या गावांतील किंवा जिल्ह्यांतील भरपूर शिकारी इथे पाहायला मिळायचे. मात्र शिकारी आले रे आले की रानडुक्करं अक्षरश: चवताळायची त्यांच्या अंगावर धावूनही यायची. Shantabai Kopargaonkar : एकेकाळच्या लावणी सम्राज्ञीला भिक मागण्याची वेळ, ST बस स्थानकच झालं घर, VIDEO एका दिवशी शेजारच्या बाडमेर जिल्ह्यातील भाखरपुरा गावाहून काही लोक इथे शिकारीसाठी आले होते. स्वरक्षणासाठी त्यांनी सोबत आपले कुत्रेदेखील आणले होते. शिकारीला सुरुवात होते ना होते तोच एका रानडुक्कराने त्यांच्या एका कुत्र्यावर झडप घातली. रानडुक्कराने त्याच्या गळ्याचा असा घोट घेतला की त्यात कुत्रा जागच्या जागीच ठार झाला. या घटनेने सर्व शिकारी घाबरले आणि मागच्या मागे पळाले. तेव्हापासून भाखरपुरात सर्वत्र भीषण शांतता पसरली. गावातील लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. गावातलं आणि गावातल्या प्रत्येक घरातलं वातावरणही कलुषित झालं होतं. यावर अनेक उपाय केले, बैठका केल्या, मात्र गुण काही येईना. अखेर एक शेवटचा उपाय म्हणून येथील लोक एका मांत्रिकाकडे गेले. मांत्रिकाने या सर्व समस्यांवर एकच उपाय सांगितला. तो म्हणजे, शिकारीदरम्यान मृत पावलेल्या कुत्र्याचं स्मारक बनवण्याचा. हे स्मारक बनवल्यानंतरच तुमच्या आयुष्यात सुख-शांती परतेल, असं मांत्रिकाने सांगितलं. मग काय, जराही उशीर न करता येथील लोकांनी मांत्रिकाने सांगितलेल्या ठिकाणी कुत्र्याचं स्मारक बांधण्यास सुरुवात केली. या स्मारकावर ‘शिकारी खंगारसिंह भाखरपुरा’ असं लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, येथील लोक दरवर्षी दिवा लावून, हार, फुलं वाहून या कुत्र्याचा शहीद दिनही साजरा करतात.