JOIN US
मराठी बातम्या / Viral / अभिनेत्याने चघळलेल्या Chewing Gum ऑनलाईन लिलाव; याच्या किमतीत विकत घेऊ शकता लग्जरी कार

अभिनेत्याने चघळलेल्या Chewing Gum ऑनलाईन लिलाव; याच्या किमतीत विकत घेऊ शकता लग्जरी कार

तो चघळलेला च्युइंगम हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियरचा आहे. तोच रॉबर्ट डाउनी ज्युनियर ज्याला जग ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 एप्रिल : एक काळ असा होता की, भारताचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची गाडी जवळून गेल्यावर त्यांच्या महिला चाहत्या त्या ठिकाणची माती उचलून सिंदूर म्हणून आपल्या डोक्याला लावायच्या. देवानंद यांना काळा कोट घालण्यास बंदी घालण्यात आली होती, कारण मुली त्यांच्या प्रेमात पडायच्या आणि अनेकांनी आपल्या आवडत्या स्टार्ससाठी आत्महत्या देखील केली. तुम्हाला वाटत असेल की सुपरस्टार्सचं ते युग गेलं, आता आजच्या काळात असं होणार नाही. जर तुम्हाला खरोखर असं वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. सध्या भारतात नाही तर अमेरिकेत असा विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे. आजकाल ऑनलाइन ई-कॉमर्स साइट ई-बे वर चघळलेला च्युइंगम विकला जात आहे. होय, एक साधा च्युइंगम आणि तोही चघळलेला, तो ऑनलाइन विकला जात आहे. याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर आता थांबा. जेव्हा तुम्हाला या च्युइंगमची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. हा च्युइंगम 10-20 रुपयांना विकला जात नाही, तर 32 लाख रुपयांना विकला जात आहे! बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक चघळलेल्या च्युइंगमची किंमत एवढी जास्त आहे, यात विशेष काय आहे, याचा विचार करणं सहाजिक आहे! वास्तविक, ज्या व्यक्तीने ई-बेवर त्याचा लिलाव करण्याची योजना आखली आहे, त्याने दावा केला आहे की तो चघळलेला च्युइंगम हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियरचा आहे. तोच रॉबर्ट डाउनी ज्युनियर ज्याला जग ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखतं. मार्वलच्या सिनेमांमध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारल्यानंतर तो इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याच्या चघळलेल्या च्युइंगमसाठी 32 लाख रुपये द्यायला तयार आहेत. च्युइंगमची सुरुवातीची किंमत 32 लाख रुपये होती, या लिलावाची अंतिम तारीख 31 मार्च होती आणि बोली लावण्याची वेळ संपली आहे. सध्या वेबसाइटवर त्याची किंमत ४५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात रॉबर्टने त्याचा मित्र अभिनेता जॉन फेवरुच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम समारंभात भाग घेतला होता. जिथे तो च्युइंगम खात होता आणि मजामस्तीत त्याने त्याच्या मित्राच्या नावाच्या स्टारवर च्युइंगम चिकटवला. ज्या व्यक्तीने ते सूचीबद्ध केलं त्याचा दावा आहे, की त्याने तिथून च्युइंगम उचलला आणि त्याच स्थितीत तो विकत आहे. जो कोणी लिलाव जिंकेल त्याला प्लास्टिकच्या बॉक्समध्ये च्युइंगमचा तुकडा पाठविला जाईल, जो खरेदीदार परत करू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या