JOIN US
मराठी बातम्या / Viral / Cute कुत्रा आरशात पाहून करतोय मजेदार काम, पाहा तुफान व्हायरल VIDEO

Cute कुत्रा आरशात पाहून करतोय मजेदार काम, पाहा तुफान व्हायरल VIDEO

सोशल मीडियावर प्राण्यांच्या व्हिडिओजना खूप मागणी असते. असाच एका हुशार कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल (viral) होईल याचा काही नेम नसतो. सोशल मीडिया युजर्सना प्राण्यांचे व्हिडिओ खूप आवडत असल्याचं दिसतं. एक व्हिडिओ सध्या लोकांना खूप आवडतो आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाळीव प्राणी असतात. त्यातही मांजर किंवा कुत्रा पाळणं अनेकांना आवडतं. हे पाळलेले प्राणी अगदी घरातलेच एक सदस्य होऊन जातात. हा व्हिडिओ आहे एका क्युट कुत्र्याचा (dog). एक लहानसा केसाळ कुत्रा या व्हिडिओमध्ये आरशात पाहतो आहे. हा कुत्रा आरशात पाहताना विविध घाबरवणारी तोंडं (frightening faces) बनवतो आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचं मोठंच मनोरंजन होत आहे. लोक विविध प्रकारच्या कमेंट्ससह भरभरून लाइक्स देत आहेत. हा व्हिडिओ खूप वेगात सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

संबंधित बातम्या

हा कुत्र्याचा व्हिडिओ Danny Deraney नावाच्या व्यक्तीनं शेअर केला आहे. या व्हिडिओत हा कुत्रा एकदम स्वतःमध्ये रमलेला दिसतो. तो चित्रविचित्र तोंडं करत स्वतःचंच निरीक्षण करतो आहे. लोक पुन्हा-पुन्हा हा व्हिडिओ पाहत कुत्र्याचं कौतुक करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 6 कोटीहून जास्त वेळा बघितलं गेलं आहे. याशिवाय या व्हिडिओला 2 लाखांवर लाइक्स मिळालेत. एका दिवसात हा कुत्रा सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या