प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
नवी दिल्ली, 10 मे : तुमचं मूल शाळेत बोलत नाही, शिकवताना लक्ष देत नाही, नीट अभ्यास करत नाही, मस्ती करतं अशा शिक्षकांच्या तक्रारी पालकांकडे येतात. यासाठी शिक्षक पालकांच्या मीटिंगही घेतात. पण सध्या एक असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यात शिक्षकांनी एका विद्यार्थ्याची त्याच्या पालकांना मीटिंगसाठी बोलावलं पण याचं कारण धक्कादायक होतं. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल होत आहे. एका मुलाने असं चित्र काढलं की ते पाहून त्याच्या शिक्षकांना घाम फुटला. त्यांनी तात्काळ त्या मुलाच्या पालकांना एमर्जन्सी मीटिंगसाठी बोलावलं. एका व्यक्तीने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. त्यात नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं आहे.
पोस्टमध्ये म्हटल्यानुसार आमचा 6 वर्षांचा मुलगा शाळेतून परतला आणि आम्हाला एक चिठ्ठी दिली. शिक्षिकेने मला आणि माझ्या पत्नीला लगेच बोलावले आहे, असं लिहिलं होतं. मी माझ्या मुलाला विचारलं, ही मीटिंग कशाबद्दल आहे, याची तुला माहिती आहे का? तर माझ्या मुलाने सांगितलं की, शिक्षकांना माझं चित्र आवडलं नाही. -20 डिग्री तापमान, भूक लागताच खायचा बर्फ; बेपत्ता 8 वर्षीय मुलगा अशा अवस्थेत सापडला की… पोस्टमध्ये त्या व्यक्तीने पुढे म्हटलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा शिक्षकांनी आम्हाला आमच्या मुलाचं चित्र दाखवलं आणि ते म्हणाले, मी तुमच्या मुलाला फॅमिली ड्रॉईंग काढायला सांगितलं होतं आणि त्याने हे काढलं. कृपया याबाबत काही सांगाल? यावर माझी पत्नी म्हणाली, यात काय सांगणार. आम्ही बहामासमध्ये स्नॉर्कलिंगला गेलो होतो. आमच्या फॅमिली हॉलिडेचं हे हे चित्र आहे. तेव्हाच शिक्षकांना चित्र नीट समजलं. खरंतर स्नॉर्कलिंगचा हा फोटो पाहताच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यात फास लटकलेला दिसतो. जे खूप भीतीदायक आहे. म्हणून पाहताच क्षणी शिक्षही घाबरले आणि त्यांनी पालकांना बोलावून घेतलं. Yuck! 2 वर्षांच्या चिमुकल्याला असं काही खायला देते आई की वाचूनच उलटी येईल; कारणही अजब या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चित्रावर असं रिअॅक्ट व्हायला नको होतं असं म्हटलं आहे. तर काहींनी शिक्षकाची अशी कृती विद्यार्थ्यांचा जीव वाचवू शकते, असं मत व्यक्त केलं आहे.
तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.