नवी दिल्ली, 24 एप्रिल : लहान मुलांना काय खायला द्यावं, काय नाही याची चिंता प्रत्येक पालका ला असते. कारण हे वय त्यांच्या शारीरिक विकासासोबतच त्याच्या मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत त्यांना जेवढे पौष्टिक अन्न मिळेल तेवढे चांगले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक आई आपल्या मुलाला असं काही खायला घालते की फक्त वाचूनच तुम्हाला उलटी येईल. कॅनडातील टोरंटो येथे राहणारी व्हीनस कलामी स्वतः फूड ब्लॉगर आहे. ती म्हणते, मुलांनी काय खावं आणि काय खाऊ नये. या वयात त्याची निवड निश्चित आहे. जर त्यांनी सर्व काही खायला सुरुवात केली तर त्यांना नंतर काही त्रास होणार नाही. ते कोणत्याही वातावरणात राहतील. त्यांच्यात नकारात्मक भावना येणार नाही. त्यांच्यात रूढींच्या पलीकडे जाण्याची शक्ती असेल.
तुम्हाला वाचूनच धक्का बसेल कलामी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला कीडे-कीटक खायला घालत आहेत. यात भरपूर प्रमाणात प्रोटिन असतं आणि इतर घटकांची कमतरता पूर्ण करतं, असा दावा तिने केला आहे. कुठे पितात पॉटी ज्युस तर कुठे उंदरांची वाईन; वाचूनच उलटी येईल असे 5 अजब ड्रिंक्स ती म्हणाली, मी आजवर ज्या देशांना भेट दिली त्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. तळलेल्या टारंटुला टांगोपासून ते विंचूपर्यंत सर्व काही चाखलं आहे. थायलंड आणि व्हिएतनामसारख्या देशांच्या प्रवासादरम्यान मुंग्यांचाही आनंद घेतला आहे. मला ते खूप आवडलं. आपल्या नेहमीच्या जेवणातही त्याचा समावेश असावा असं मला वाटते. काही दिवसांपूर्वी मी परत आले आणि माझ्या 2 वर्षाच्या मुलालाही हे खायला द्यायचं ठरवलं. मला वयाच्या सहाव्या महिन्यांपासून त्याला हे द्यायचं होतं पण मला ते शक्य झालं नाही. फक्त 2 चमचे झिंगूर पावडर मुलाच्या दैनंदिन गरजेच्या 100% पुरवते. यामुळे लोहाची कमतरता पूर्ण होते आणि मुलामध्ये कधीही अॅनिमिया होत नाही. पचनक्रियाही चांगली होईल, असं ती म्हणाली. चुकूनही खाल तर तुमच्या जीवाला धोका; बंदी असूनही विकला जातोय हा खतरनाक मासा इनसाइडरच्या बातमीनुसार, कलामी म्हणाली, वस्तुस्थिती अशी आहे की मला माझ्या जेवणाचा खर्च कमी करायचा होता. महागाई इतकी आहे की आता दर आठवड्याला 300 डॉलरपेक्षा अधिक खर्च खाण्यावर होत आहे. आम्ही अनेकदा मांस खरेदी करू शकत नाही. यामुळे मुलाला योग्य प्रोटीन मिळत नव्हते. त्यामुळे मी त्याला झिंगूर पफ स्नॅक्स, झिंगूर प्रोटीन पावडर आणि भाजलेले झिंगूर खायला द्यायचे ठरवले. यामुळे आमचे आठवड्याचा खाण्याचा खर्चही कमी झाला.
आता तिने इतर पालकांंनाही मुलांना असे विचित्र पदार्थ खायला देण्याचा सल्ला दिला आहे. मुलांना हे पदार्थ देण्यापूर्वी ते त्यांना ते कसे द्याल ते ठकवा. लापशीमध्ये तुम्ही ग्राउंड प्रॉन्स जोडू शकता. तुम्ही त्याची प्युरी बनवून त्यात घालू शकता. किंवा फिंगर फूड म्हणूनही देऊ शकता, असं ती म्हणाली.