जाहिरात
मराठी बातम्या / Viral / -20 डिग्री तापमान, भूक लागताच खायचा बर्फ; बेपत्ता 8 वर्षीय मुलगा अशा अवस्थेत सापडला की...

-20 डिग्री तापमान, भूक लागताच खायचा बर्फ; बेपत्ता 8 वर्षीय मुलगा अशा अवस्थेत सापडला की...

हुडहुडत्या थंडीत चिमुकल्याने खाल्ला बर्फ

हुडहुडत्या थंडीत चिमुकल्याने खाल्ला बर्फ

एक हरवलेला मुलगा एकटा बर्फाळ प्रदेशात हुडहुडत्या थंडीत राहिला. जेव्हा तो सापडला तेव्हा त्याला त्या अवस्थेत पाहून बचाव पथकही आश्चर्यचकीत झालं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 10 मे :  सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे थंडगार पाणी, बर्फही हवाहवासा वाटतो. त्यामुळे बर्फाच्या गोळ्यावर चांगलाच ताव मारला जातो. पण थंडीत हेच पाणी आणि बर्फ हातात धरला, तोंडात गेलं तरी हात-तोंड सुन्न पडतं. विचार करा असं ठिकाण जिथं उणे तापमान आहे, रक्त गोठवणारी अशी थंडी आहे, सगळीकडे बर्फच बर्फ आहे आणि तिथं तुम्हाला कुणी बर्फ खायला सांगितला तर… विचारही तुम्हाला नकोसा झाला असेल. पण अवघ्या 8 वर्षांच्या मुलावर अशी वेळ ओढावली. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील ही घटना. एक 8 वर्षांचा मुलगा  -20 डिग्री तापमानात एकटा होता. जिथं तो भूक भागवण्यासाठी फक्त बर्फ खात राहिला. नॅन्टे नीमी असं या मुलाचं नाव आहे. तो लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. पण तिथं तो रस्ता चुकला. त्याला मार्ग सापडत नव्हता. तो  तो फूटपाथवरून चालत राहिला. आता बाहेर पडता येणार नाही असे वाटल्यावर त्याने एका छोट्या टेकडीवरून खाली उडी मारली. तो जाऊन एका झाडावर लपला.

News18लोकमत
News18लोकमत

त्या ठिकाणी खूप बर्फ होता आणि खूप थंडी जाणवत होती. त्याच्या अंगावर फक्त स्वेटर होतं. इतकी थंडी तो सहन करू शकत नव्हता. थंडीपासून वाचवण्यासाठी त्याने झाडांच्या फांद्या तोडल्या, त्यापासून छोटीशी झोपडी तयार केली या घरात तो राहू लागला. पानांपासून घोंगडी आणि एक पलंग तयार केला. ज्यावर तो झोपायचा. त्याच्याकडे खायलाही काहीच नव्हतं. भूक लागली की तो बर्फ खात असे. महिलेनं मागवला 25 हजार रुपयांचा केक, पण पाहून खायची हिंमतच झाली नाही; कारण… मुलगा बेपत्ता झाला म्हणून इकडे त्याच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा शोध सुरू होता. 150 हून अधिक सुरक्षा कर्मचारी आकाशात, पाण्यात आणि रस्त्य्यावर त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. नऊ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. सुमारे 40 चौरस मैल क्षेत्राचा प्रत्येक कोपरा शोधण्यात आला. शेवटी तो एका झाडावर दिसला. त्याचं बचावकार्य सुरू झालं. मिशिगन पोलिसांनी त्याला हेलिकॉप्टरने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आपल्याला पायी जायचं असल्याचं सांगितलं. अखेर त्याला सुखरूप त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आलं. तब्बल दोन दिवसांनी तो घरी परतला होता. विचित्र पायांची माणसं; यांना पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात लोक जगण्यासासाठी त्याने असा मार्ग अवलंबला की त्याला पाहून बचाव पथकालाही आश्चर्य वाटलं.

जाहिरात

@MSPEighthDist ट्विटर अकाऊंटवर या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात