JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने केली सिझेरियन डिलीव्हरी; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO

OMG! अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने केली सिझेरियन डिलीव्हरी; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIRAL VIDEO

सिझेरियन डिलीव्हरी करणाऱ्या 4 वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

4 वर्षांच्या मुलाने केली सर्जरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : अनेकांना साधं इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तरी भीती वाटते. मग कुणाला इंजेक्शन देणं तर दूरचीच गोष्ट. आपल्या हाताला साधी चिर गेली आणि त्यातून रक्त वाहू लागलं, तरी चक्कर येतं. असं असताना अवघ्या चार वर्षांचा मुलगा सिझेरियन डिलीव्हरी करतो, हे वाचून तर धक्का बसणारच ना. पण असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. सामान्यपणे शिक्षकाला आपली मुलं शिक्षक, इंजिनीअरला आपला मुलं इंजिनीअर आणि डॉक्टरांना आपली मुलं डॉक्टर व्हावीत असं वाटतं. यासाठी त्यांना तसं लहानपणापासूनच बाळकडू दिलं जातं. पण तुम्हाला धक्का बसेल, एका डॉक्टर महिला आपल्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी असं तयार करते आहे की तुम्ही विचारही केला नसेल. डॉक्टर आई आपल्या मुलाला सिझेरियन डिलीव्हरीसाठी ट्रेनिंग देते आहे. आता आई डॉक्टर असली तरी इतक्या लहान वयाच्या मुलाला कुणी सिझेरियन डिलीव्हरी करायला देईल का? आणि तो मुलगा करेल तरी काय?, असे प्रश्न उपस्थितत होतातच. यासाठी नेमकं या मुलाने आधी काय केलं आहे ते पाहुयात. OMG! आईच्या पोटात बाळाने केलं असं कृत्य; VIRAL VIDEO पाहून सर्वजण थक्क व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कुणाचा चेहरा दिसत नाही आहे. पण एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा हात दिसतो आहे. व्हिडीओ दिलेल्या माहितीनुसार मुलाचं वय चार वर्षे आहे. त्याची डॉक्टर आई त्याला सिझेरियन डिलीव्हरी कशी करायचं ते सांगते आहे आणि मुलगा तसतसं करतो आहे. व्हिडीओ नीट पाहाल तर ही सर्जरी कोणत्या माणसांवर केली जात नाही आहे. म्हणजे प्रत्यक्षात ती होत नाही. तर एका डमीवर केलं जातं आहे. म्हणजे प्ले क्लेपासून मानवी पोट तयार करण्यात आलं आहे. त्यात अगदी माणसाच्या पोटाच्या वरच्या भागापासून आतल्या भागापर्यंत थर असतात अगदी तसेच थर तयार करण्यात आले आहेत. असं सरप्राईझ कोण देतं! लेक 18 वर्षांचा होताच आईने बर्थडेला नको तेच केलं; मुलालाही वाटली लाज डॉक्टर आई मुलाला एकएक थराला छेद देऊन त्याची माहिती देताना दिसते आहे. आई थोडं दाखवते, तसं मुलगा छेद देतो आणि थर वेगळे करत जातो.

संबंधित बातम्या

@thebreakfasteur इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या