नवी दिल्ली, 29 जून : आईच्या पोटात असलेलं बाळ लाथा मारताना तुम्ही पाहिलं असेल. लाथा मारताना बाळाची पावलं पोटावरही स्पष्टपणे दिसतात. पण आता एक असं बाळ जे आईच्या पोटात लाथा मारण्याव्यतिरिक्त असं काही करताना दिसलं, की व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहे. बाळाचं आईच्या पोटातील ते कृत्य अल्ट्रासाऊंडन मशीनमध्ये कैद झालं आहे. बाळाचं सर्वात पहिलं नातं जुळतं ते त्याच्या आईच्या. गर्भापासूनच या नात्याची सुरुवात होते. आईचं खाणंपिणं, तिचं वागणं या सर्वांचा परिणाम त्या बाळावर होत असतो. आईच्या पोटात बाळ काय करत असेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. अल्ट्रासाऊंडमध्ये पोटातील बाळाला आपल्याला पाहता येतं, अशाच अल्ट्रासाऊंडचा हा व्हिडीओ आहे. ज्यात बाळ विचित्र काहीतरी करताना दिसलं.
माहितीनुसार ज्या बाळाचा हा व्हिडीओ आहे, तेव्हा हे बाळ पोटात पंधरा आठवड्यांचं होतं. म्हणजे चार महिन्यांना एक आठवडा कमी. इतक्या कमी दिवसांचं बाळ आईच्या पोटात असं काही करताना दिसलं की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल. संतापजनक VIDEO! बाळाला उकळत्या दुधाची अंघोळ; तडफडत होता चिमुकला, सर्व पाहत राहिले तमाशा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बाळाने आपल्या हाताचा एक बोट उचललं आहे आणि ते बोट तो आईच्या पोटावर मारताना दिसतो आहे. जणू आईला तो खाजवतो आहे किंवा गुदगुदल्या करतो आहे, असंच पाहताच क्षणी वाटतं. @netflixnmovies इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. सुरुवातीला यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. Shocking! नवजात बाळाला आले 3 Heart attack; नागपुरातील धक्कादायक प्रकरण, डॉक्टरांनी सांगितलं कारण काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटला. हे बाळ गर्भात असताना अशी स्थिती आहे तर बाहेर आल्यावर काय होईल, असं एका युझरने म्हटलं आहे. तर काहींनी बाळ पोटात असताना आईला किती त्रास सहन करावा लागतो, आई होण्याचा प्रवास खूप कठीण आहे, अशा कमेंटही केल्या आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, त्यावरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.