JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: भरधाव वेगात असलेल्या स्कूटीवर अचानक कोसळली झाडाची फांदी, तिघांची भयानक अवस्था

Viral Video: भरधाव वेगात असलेल्या स्कूटीवर अचानक कोसळली झाडाची फांदी, तिघांची भयानक अवस्था

व्हिडिओमध्ये दिसतं की रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरून एक फांदी अचानक खाली पडताना दिसते. ही फांदी रस्त्यावरुन जात असलेल्या स्कूटीवरील तिघांच्या डोक्यावर पडते.

जाहिरात

स्कूटीवर झाडाची फांदी कोसळून तिघे जखमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 31 मे : रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार येत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून युजर्सही हैराण होतात. रस्ते अपघातांचे हे व्हिडिओ वापरकर्त्यांना भविष्यात अशा अपघातांपासून सुरक्षित राहण्यास शिकवतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये स्कूटीवर बसलेले तीन तरुण अचानक एका अपघाताला बळी पडताना दिसत आहेत. अपघाताचा हा अजब व्हिडिओ राजस्थानमधील जोधपूरचा आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरून एक फांदी अचानक खाली पडताना दिसते. ही फांदी रस्त्यावरुन जात असलेल्या स्कूटीवर तिघांच्या डोक्यावर पडते. त्यामुळे स्कूटीवर बसलेले तिघे तरुण याखाली चिरडले जातात. ते पाहून स्थानिक लोक तात्काळ समोरून धावत येतात आणि त्यांना झाडाच्या फांदीखालून बाहेर काढताना दिसतात. Viral : एस्केलेटवर चढताना तुम्ही तर करत नाही ना अशी चूक? VIDEO पाहून बसेल धडकी सहसा पोलीस प्रशासन रस्त्यावरून चालताना नियमांचं पालन करण्याच्या कडक सूचना देतात. मात्र स्कूटीवर स्वार असलेल्या तिन्ही तरुणांनी हेल्मेट घातलेलं नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकत होतं. सध्या जोराचा वारा आणि वादळ सुरू असल्याने अनेक ठिकाणी अचानक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये झाडाची फांदी अंगावर पडताच स्कूटीवरील तरुण खाली पडताना दिसत आहेत. त्यानंतर ते फांदीखाली अडकून जखमी होतात. त्याचवेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीचा हात पुढे करून त्यांना तिथून बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात नेलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो शेअर करताना लोक रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी बोलताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या