जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral : एस्केलेटवर चढताना तुम्ही तर करत नाही ना अशी चूक? VIDEO पाहून बसेल धडकी

Viral : एस्केलेटवर चढताना तुम्ही तर करत नाही ना अशी चूक? VIDEO पाहून बसेल धडकी

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थोडक्यात बचावली आहे. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण हाँगकाँगमधील वोंग ताई सिन मेट्रो रेल्वे स्टेशनवर एस्केलेटरवर घडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 31 मे : सोशल मीडियाची दुनियाच काही वेगळी आहे. इथे कधी मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात. तर कधी काही गोष्टी आपल्यासमोर उदाहरण उभ करतात. ज्यामुळे आपल्या लक्षात येते की कोणता मुर्खपणा करु नये. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थोडक्यात बचावली आहे. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण हाँगकाँगमधील वोंग ताई सिन मेट्रो रेल्वे स्टेशनवर एस्केलेटरवर घडली. या घटनेत एका महिलेचा तोल गेला आणि ती दोन जणांवर पडली, त्यामुळे तिघेही अपघाताचे बळी ठरले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या समजुतीमुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Fun fact : कधी विचार केलाय की पक्षी ‘V’ आकारातच का उडतात? या घटनेच्या व्हिडिओमध्ये तीन महिला एस्केलेटरवरून पडल्याचे दिसत आहे. पडलेल्यांमध्ये व्हील चेअर असलेली एक महिला होती. ती पडताच एक व्यक्ती लगेच येऊन एस्केलेटरचे आपत्कालीन बटण दाबते आणि एस्केलेटर थांबते. यानंतर काही महिला येऊन अपघातग्रस्त महिलांना मदत करतात.

हाँगकाँग रेल्वे स्टेशनचा हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अपघाताच्या दिवशी एस्केलेटर उत्तम प्रकारे काम करत होते. सहसा असे अनेक लोकांसोबत घडते की ते एस्केलेटरमध्ये जाण्यास घाबरतात आणि भीतीने थरथर कापतात, जेव्हा ते एस्केलेटरवर पाऊल ठेवतात तेव्हा ते घाबरतात. अशा वेळी त्यांच्यासोबत अपघात होतोच, तसेच त्यांच्या मागे उपस्थित असलेले लोकही अपघाताचे बळी ठरतात. Jugad : एकापेक्षा एक भन्नाट देसी जुगाड, Viral फोटो पाहून चक्रावाल त्यामुळे हा व्हिडीओ पाहा आणि तुम्ही देखील अशी चुक करत असाल तर ती आत्ताच सुधारा. तसेच एक्सेलेटरवर घाबरण्याचा आणि असं करण्याचा प्रकार टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात