प्रतिकात्मक फोटो
मुंबई 17 मार्च : जगात अशा अनेक विचित्र घटना घडतात, ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. कधी कधी अशा घटना आपल्या सामान्य जीवनात घडतात, तर कधी काही लोक असं काहीतरी करतात, जे ऐतिहासिक घटनांसोबत स्मरणात ठेवलं जातं. अशीच एक घटना आफ्रिकन देश युगांडामध्ये घडली होती. इथे 200 कैदी एकत्र तुरुंगातून पळून गेले, तेही विवस्त्र. तरुणाने सख्ख्या बहिणीसोबतच केलं लग्न; 2 मुलंही झाली, पण 6 वर्षांनी घडलं अजब ही बाब फार जुनी किंवा फार अलीकडचीही नाही. ही घटना 2020 मध्ये घडली होती आणि त्यावेळी ती चर्चेत होती. कारागृहातून कैदी पळून जाणे ही मोठी गोष्ट नसली तरी या कैद्यांची संख्या शेकडोच्या घरात होती आणि त्यांनी पूर्ण नियोजन करून तिथून पळ काढला होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे जाण्यापूर्वी कैद्यांनी तुरुंगातील कपडे काढून ठेवत शस्त्रे सोबत नेली. युगांडामध्ये कैद्यांना तुरुंगात ठेवताना त्यांना पिवळे कपडे दिले जातात. या कैद्यांनीही हाच पोशाख परिधान केला होता, मात्र जेव्हा त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला तेव्हा त्यांनी आधी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवलं. त्यानंतर सर्व कैद्यांनी आपले कपडे काढून तिथे फेकून दिले आणि तुरुंगातून पळ काढला. युगांडाच्या ईशान्य भागात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला. कैदी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात मारामारी आणि गोळीबारही झाला, ज्यामध्ये दोन कैदी आणि एक सैनिकही ठार झाला. मात्र हे कै आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाले आणि कपड्यांशिवायच जंगलात फरार झाले
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल की ते पळून जात असताना कपडे काढायची काय गरज होती? तर, आपला पिवळा पोशाख सोबत असेल तर पोलीस किंवा लष्कर आपल्याला ओळखेल, अशी भीती कैद्यांना होती. अशा स्थितीत त्यांनी अंगावर घातलेले सर्व कपडे काढून तिथून पळ काढला. हे सर्व कैदी प्राण्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात बंद होते.