मुंबई 16 मार्च : लग्नाबाबत जगात सर्वत्र वेगवेगळ्या प्रथा आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे पती-पत्नीमध्ये रक्ताचे अगदी जवळचं नातं नसतं. आपल्या देशात धर्म-जात-गोत्र अशा अनेक गोष्टी बघितल्या जातात, मग दोन लोक लग्न करतात. पण इतर ठिकाणी निदान इतकी काळजी तर घेतलीच जाते, की पती-पत्नीचं थेट रक्ताचं नाते नसावं.
ही एक पुराणमतवादी किंवा केवळ तयार केलेली परंपरा नाही. डीएनए मॅच आणि रक्ताच्या नात्यात लग्न झाल्यास येणाऱ्या पिढीमध्ये जनुकीय दोष निर्माण होण्याचा धोका असल्याचं वैद्यकीय शास्त्राचंही मत आहे. एखाद्या मात्र एका व्यक्तीसोबत नकळत ही घटना घडली. त्याला त्याच्या लग्नाच्या 6 वर्षानंतर कळालं की ज्या मुलीसोबत त्याने त्याचा संसार थाटला होता, ती त्याचीच बहीण आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने स्वतः ही गोष्ट सोशल मीडियावर लोकांसोबत शेअर केली आहे की त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. या व्यक्तीला त्याच्या जन्मानंतर लगेचच दुसऱ्याने दत्तक घेतलं होतं. अशा परिस्थितीत, त्याला त्याच्या बायोलॉजिकल पालकांबद्दल काहीही माहित नव्हतं. मोठं झाल्यावर त्याचे त्याच्याच शहरातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि दोघांनी 2 वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केलं. त्यांना दोन मुलंही झाली पण मुलांचा जन्म झाल्यावर पत्नी आजारी पडू लागली. याच आजारावर उपचार घेत असताना खुलासा झाला, की या व्यक्तीने जिच्यासोबत लग्न केलं आहे, ती त्याचीच सख्खी बहीण आहे.
पत्नीला किडनीचा त्रास होता आणि तिला प्रत्यारोपणाची गरज होती. तिच्या कुटुंबीयांच्या चाचण्या झाल्या पण किडनी दानासाठी कोणाचाच उपयोग झाला नाही. मात्र, जेव्हा नवऱ्याने टेस्ट करून घेतली तेव्हा हे केवळ मॅचच झालं नाही तर पॉझिटिव्ह रेट इतका जास्त होता, की डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं की सहसा पालकांसह मुलांचा हे सर्व तंतोतत जुळण्याचा दर 50 टक्के असतो, परंतु भावंडांमध्ये हा दर 100 टक्क्यांपर्यंत असतो. हे पती-पत्नीमध्ये कधीच घडत नाही, फक्त भाऊ आणि बहीण एवढ्या यांच्यातच पॉझिटिव्हिटी रेट इतका जास्त असू शकतो. हे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला कारण त्याच्या वैवाहिक आयुष्याला 6 वर्षे झाली आहेत आणि 2 मुलांसह तो पत्नीसोबत सुखी संसार करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral news