JOIN US
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्याने लहान भावाला बास्केटमध्ये बंद करून पायऱ्यांवरुन ढकललं अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चिमुकल्याने लहान भावाला बास्केटमध्ये बंद करून पायऱ्यांवरुन ढकललं अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये दोन मुलं घराच्या पायऱ्यांवर एक धोकादायक खेळ खेळताना दिसत आहेत. ज्यामध्ये एक मुलगा दुसऱ्या मुलाला मोठ्या बास्केटमध्ये बंद करतो आणि नंतर ही बास्केट पायऱ्यांवरून खाली लोटतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 26 मार्च : मुलं खूप निरागस असतात आणि त्यांना खेळायला खूप आवडतं. लहान वयात मुलांची खूप काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या लहानपणी त्यांना हे माहिती नसतं की त्यांच्यासाठी कोणते खेळ खेळणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे काहीही विपरित घडू नये यासाठी पालकांना मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. अनेकदा मुलं स्वतःच असा काहीतरी खेळ शोधतात जो अतिशय घातक असतो. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन लहान मुलं खेळ खेळताना दिसतात, जो पाहून कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढतील. स्टंटबाजीमुळे व्यक्तीची अवस्था बिकट, दुचाकी घेऊन तोंडावर पडला, पाहा Video व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलं घराच्या पायऱ्यांवर एक धोकादायक खेळ खेळताना दिसत आहेत. ज्यामध्ये एक मुलगा दुसऱ्या मुलाला मोठ्या बास्केटमध्ये बंद करतो आणि नंतर ही बास्केट पायऱ्यांवरून खाली लोटतो. जेव्हा ही बास्केट पायऱ्यांवरून खाली जात असते तेव्हा बघणारेही सगळे काही काळ श्वास रोखून धरतात.

संबंधित बातम्या

या पायऱ्यांवरुन खाली आल्यावर बास्केटमधील मुलाचं काय झालेलं असेल याचाच विचार बघणारेही करू लागतात. पण टोपली खाली आल्यावर याच्या आतमध्ये बसलेला मुलगा ती उघडतो आणि हसत बाहेर येतो. हे पाहून नेटकरीही मोकळा श्वास सोडत आहेत

हा खेळ त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. असं असताना ही मुलं अगदी सहजपणे हा धोकादायक खेळ खेळत आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत. जो कोणी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, तो मुलांना हा धोकादायक खेळ खेळण्यापासून रोखण्याऐवजी गंमत म्हणून त्यांचा व्हिडिओ बनवत आहे. मात्र, या मुलाला बास्केटमधून सुखरूप बाहेर येताना पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लोकांनी मूल सुरक्षित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या