नवी दिल्ली, 26 मार्च : आजकाल इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची आणि हटके करण्याची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. अनेकदा लोक मजेशीर, धोकादायक स्टंट करताना दिसून येतात. सोशल मीडियावरही याचे अनेक व्हिडीओही व्हायरल होतात. असाच एक स्टंट व्हिडीओ सध्या समोर आला असून हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाईक चालवताना कसा स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. कधी तो दुचाकीचे पुढचे चाक उचलतो तर कधी दोन्ही हात सोडून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, तो अचानक चालत्या बाईकवरून उतरतो आणि जमिनीवर पळण्याचा प्रयत्न करतो, मात्र अचानक त्याचा तोल बिघडला आणि तो दुचाकीसह भयानक प्रकारे पडला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
किस किस को ये stunt करना है ??? pic.twitter.com/ofmsYGB2fu
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) March 24, 2023
हा व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटरवर आयडीवर शेअर करण्यात आला आहे आणि 'किस किस को ये स्टंट करना है?' असे कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येताना दिसत आहे.
दरम्यान, स्टंट हे लहान मुलांचे खेळ नाही जे कोणीही करू शकते. यामध्ये खूप धोका आहे. म्हणूनच सर्व व्यावसायिक लोक जे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात, ते खूप काळजी घेतात आणि सुरक्षिततेचा वापर करतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये. मात्र आजकाल अनेकजण या गोष्टी आजमावतात कोणत्याही सुरक्षिततेवशिवाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Social media viral, Stunt video, Video viral, Viral