जगातल्या सर्वात महाग नेल पॉलिशची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल 

जगातील सर्वात महाग नेल पॉलिशच्या एका बाटलीच्या किमतीत तुम्ही आलिशान कार-बंगला खरेदी करू शकता

किंवा तुम्ही मुंबईत एखादा लग्जरी फ्लॅट खरेदी करू शकता 

जगातील सर्वात महागड्या नेल पॉलिशचं नाव अॅझेचर ब्लॅक डायमंड आहे. 

ही काळ्या रंगाची नेलपॉलिश लॉस एंजेलिस येथील डिझायनर अझॅचर पोगोसियन यांनी तयार केली आहे.

या काळ्या रंगाच्या नेल पॉलिशच्या एका बाटलीची किंमत सुमारे $2,50,000 म्हणजेच 1 कोटी 90 लाख रुपये आहे.

या काळ्या रंगाच्या नेल पॉलिशच्या खरेदीदारांमध्ये हॉलिवूड अभिनेत्री मेगन फॉक्स, केली क्लार्कसन आणि लिव्ह टायलर यांची नावं आहेत.

याआधीही या ब्रँडने लाखो रुपये किमतीचे नेलपॉलिश आणि हिरे बाजारात आणले होते. पण ब्लॅक डायमंड नेल पॉलिशसमोर सर्व काही फिके पडले.

अझॅचर ब्लॅक डायमंड नेल पॉलिश इतकी महाग असण्याचं रहस्य म्हणजे ते बनवण्यासाठी वापरलेले साहित्य आहे.

त्याची रचना करणाऱ्या डिझायनरने ती बनवण्यासाठी 267 कॅरेटचा काळा डायमंड वापरला आहे.