सिंहांनी ठोकली धूम
मुंबई 21 जून : वन्यजीवन हे अविश्वसनीय आणि आश्चर्यांनी भरलेलं आहे. शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार एकाच जंगलात सोबत राहतात. मांसाहारी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. सिंहांना जंगलाचा राजा आणि भयंकर शिकारी म्हणून ओळखले जाते. परंतु, अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा हे क्रूर आणि दुष्ट प्राणी काही बलाढ्य प्राण्यांना पाहून माघार घेतात आणि पळून जातात. Video Viral : घराच्या छताला लटकत होता मुलगा, खतरनाक वाघानं उडी घेतली आणि… आम्ही असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यात एका प्राण्याला पाहून चक्क जंगलाच्या राज्याने धूम ठोकल्याचं पाहायला मिळतं. आता हा प्राणी नेमका कोणता असेल, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर हा प्राणी आहे गेंडा. जंगलाचा राजाही गेंड्यासोबत पंगा घेणं टाळतो. व्हिडिओमध्ये दोन गेंडे एका मार्गावरुन चालताना दिसत आहेत तर दोन नर सिंह रस्त्याच्या कडेला विसावताना दिसतात.
अचानक दोन्ही सिंह उभे राहतात आणि गेंड्यांपासून दूर जाऊ लागतात. गेंडा जवळ आल्यावर सिंह बाजूला होतात आणि गवताळ भागात जातात. गेंड्यांना पाहिल्यानंतर सिंह भीतीने गवतात लपून बसले असून त्यांना गेंड्यांच्या भीतीने तिथून पळून जावं लागल्याचं दिसतं. गेंडा पुढे सरकताच सिंह या संकटापासून वाचत जंगलात निघून जातो. गेंडा अगदी क्षणभर थांबतो आणि मग आपल्या वाटेला लागतो. गेंडा अगदी शांत असतो पण ते त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ देत नाहीत जेव्हा त्यांना असुरक्षित आणि भीती वाटते तेव्हा ते लगेच भडकतात. कदाचित याच कारणामुळे गेंड्यांना पाहताच हे सिंह त्यांच्या मार्गातून बाजूला झाले. EtoEtna ने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. सिंहांची अशी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर इंटरनेट वापरकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत.