इस्लामाबाद, 27 डिसेंबर : पाकिस्तानचे रेल्वेमंत्री (Pakistan’s Rail Minister) शेख रशीद (Sheikh Rashid)आपल्या कामांपेक्षा इतर उद्योगांमुळेच पाकिस्तानी मीडियात जास्त चर्चेत असतात, हे पुन्हा एकदा जगापुढे सिद्ध झालं. सध्या TikTok स्टार हरीम शाहशी बातचीत करतानाचा त्यांचा एक VIDEO सोशल मीडियावर viral होत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दिलेल्या बातमीनुसार, गुरुवारी पाकिस्तानात सोशल मीडियावर हा व्हिडिओ फिरत होता. इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातले रेल्वे मंत्री शेख रशीद सोशल मीडिया स्टार हरीम शाहबरोबर बोलताना या व्हिडिओत दिसतात. रशीद आपल्याला त्यांचे न्यूड फोटो पाठवतात, असा आरोप हरीम शाह या व्हिडिओत करताना दिसते. हे पाहा - काँग्रेस नेत्याने सांगितलं, ‘पेट्रोल-डिझेल तयार ठेवा आणि सगळं जाळून टाका’; VIDEO VIRAL आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रशीद नव्या वादात पूर्णतः अडकले आहेत. काय आहे त्या व्हिडिओत? या व्हिडिओत हरीम शाह रशीद यांच्याशी बोलताना दिसते. ‘मी कधी तुमचं रहस्य कुणाला सांगितलं नाही. तरीही तुम्ही माझ्याशी चांगलं का बोलत नाही?’ चिडलेले रशीद त्यावर “‘तुम्हारी जो मर्जी वो करो’, असं म्हणताना दिसतात. त्यानंतर हरिम ‘क्या आप उन न्यूड तस्वीरों को भूल गए हैं जो आप मुझे भेजते थे’, अशा शब्दांत धमकी देताना व्हिडिओत रेकॉर्ड झालं आहे. हरीम शाह आणि शेख रशीद यांच्याबद्दल पहिल्यांदाच माध्यमांसमोर माहिती आलेली आहे, असं नाही. पूर्वी एकदा या दोघांचा एक फोटो (सेल्फी) व्हायरल झाला होता. या नव्या व्हिडिओमुळे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातले हे मंत्री चांगलेच अडचणीत आले आहेत. अन्य बातम्या आदित्य ठाकरेंनी साधला अमृता फडणवीसांवर निशाणा 17 वर्षीय युवतीनं चक्क चोरलं विमान, टेकऑफच्या प्रयत्नात भिंतीला दिली जोरदार धडक नमाज पठण करणारा हाजी धावला नसता तर मी वाचलो नसतो, पोलिसाने शेअर केला अनुभव अर्पिता खानला कन्यारत्नाचा लाभ, सलमानला मिळालं ‘बेस्ट बर्थडे गिफ्ट’