17 वर्षीय युवतीनं चक्क चोरलं विमान, टेकऑफच्या प्रयत्नात भिंतीला दिली जोरदार धडक, पाहा थरारक VIDEO

17 वर्षीय युवतीनं चक्क चोरलं विमान, टेकऑफच्या प्रयत्नात भिंतीला दिली जोरदार धडक, पाहा थरारक VIDEO

विमान चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या 17 वर्षीय युवतीला अटक

  • Share this:

कॅलिफोर्निया, 27 डिसेंबर: 17 वर्षांची युवती एअरपोर्टमध्ये छुप्या पद्धतीनं घुसून एका छोट्या विमानची चोरी करताना पकडली गेली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विमानतळावर हा धक्कादायक प्रकार घडला. विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात असतानाही ही युवती सर्वांची नजर चुकवून विमानतळावर घुसली आणि तिने एका छोट्या विमानाचा ताबा घेतला. ते विमान चोरून नेण्याचा युवतीचा डाव मात्र पुरता फसल्यानं हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांकडून 17 वर्षांच्या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून युवती विमानतळावर आली. तिने एका छोट्या विमानाचा ताबा घेतला. विमान उड्डाण करण्यासाठी ती सज्ज झाली. त्या विमानाचं उड्डाण नीट होऊ न शकल्यानं विमान थेट भिंत तोडून एअरपोर्टपरिसरात घुसलं. ही घटना फ्रेस्नो योशिमाइट इंटरनेशनल विमानतळावर घडली आहे. विमानतळावरील पोलीस प्रमुख ड्र्यू बॅसिंजर यांनी दिलेल्या माहितीनुसार युवतीनं विमानचं इंजिन सुरु केलं होतं. युवतीने लष्करी क्षेत्रापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या व्यावसायिक टर्मिनल्स आणि कुंपणात घुसखोरी केली होती. विमानतळावरील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्या नसल्याची माहिती पोलीस प्रमुखांनी दिली.

हेही वाचा-UBER बुकिंग करताना कमाल, कारने जायचं होतं मिळालं हेलिकॉप्टर

विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेआधी या युवतीने इंजिन सुरू केल्यानंतर विमानाने एक राऊंड मारला. विमानतळ आणि फ्रेस्नो पोलीस अधिकाऱ्यांनी 911 नंबरवर माहिती देताना पायलटच्या सीटवर एक युवतीला बसल्याचं पाहिलं होतं. दुर्घटनेनंतर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. विमान चालवणाऱ्या 17 वर्षीय युवतीनं कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विमान चोरण्याचा प्रयत्न का आणि कशासाठी करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. यासोबतच इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ती युवती विमानतळावर घुसली कशी असा सवालही उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय युवतीला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी दहशतवादाशी कोणताही संबंध नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. चौकशीअंती विमानचोरीमागचं कारण समजेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा-लेकीसोबत शिक्षकाने केले नको ते कृत्य, आईने शाळेत जाऊन चप्पलेनं फोडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या