जाहिरात
मराठी बातम्या / देश / CAA Protest : नमाज पठण करणारा हाजी धावला नसता तर मी वाचलो नसतो, पोलिसाने शेअर केला अनुभव

CAA Protest : नमाज पठण करणारा हाजी धावला नसता तर मी वाचलो नसतो, पोलिसाने शेअर केला अनुभव

CAA Protest : नमाज पठण करणारा हाजी धावला नसता तर मी वाचलो नसतो, पोलिसाने शेअर केला अनुभव

आंदोलक आणि पोलिस एकमेकांसमोर आले होते. तेव्हा एक पोलीस कर्मचारी अजय कुमार हे जमावाच्या तावडीत सापडले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

फिरोजाबाद, 27 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन अजुनही सुरूच आहेत. अनेक राज्यांमध्ये हा कायदा मागे घेण्यासाठी शांततेत आंदोलन केलं जात आहे. गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागात तणावाचे वातावरण झाले होते. हिंसाचारात काहींचा बळीदेखील गेला होता. दरम्यान, फिरोजाबादमध्ये एक माणुसकी दाखवणारी घटना घडली आहे. जमाव पोलिसाच्या अंगावर धावून जात असताना त्याच गर्दीतून पुढे आलेल्या व्यक्तीने पोलिसाचा जीव वाचवला. गेल्या आठवड्यातील ही घटना असून फिरोजाबादमध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आंदोलक आणि पोलिस एकमेकांसमोर आले होते. आंदोलक दगडफेक करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी अजय कुमार जमावाच्या तावडीत सापडले होते. त्यांना जमावातील काहींनी मारहाण कऱण्यास सुरुवात केली. जमावाकडून अजय कुमार यांना मारहाण सुरु असतानाच त्यांच्या मदतीला एक माणूस धावून आला. नमाज पठण करणारे हाजी कादीर यांना एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. जमावाला बाजूला सारत अजय कुमार यांची सुटका केली.

जाहिरात

अजय कुमार यांना जमावाच्या तावडीतून सुटल्याच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. हिंसक जमावाकडून मारहाण खूप भयानक होती असं त्यांनी म्हटलं. हाजींनी मला संतापलेल्या लोकांच्या तावडीतून सोडवलं नसतं तर मी जिवंत राहिलो नसतो. त्यांनी मला वाचवलं आणि त्यांच्या घरी नेलं. मला जखम झाली होती. माझे कपडे फाटले होते. मला कपडे दिले आणि मी सुरक्षित असल्याचा विश्वास दिला असंही अजय कुमार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात