जाहिरात
मराठी बातम्या / देश / काँग्रेस नेत्याने सांगितलं, 'पेट्रोल-डिझेल तयार ठेवा आणि सगळं जाळून टाका'; VIDEO VIRAl

काँग्रेस नेत्याने सांगितलं, 'पेट्रोल-डिझेल तयार ठेवा आणि सगळं जाळून टाका'; VIDEO VIRAl

काँग्रेस नेत्याने सांगितलं, 'पेट्रोल-डिझेल तयार ठेवा आणि सगळं जाळून टाका'; VIDEO VIRAl

काँग्रेस नेत्याने आपण कार्यकर्त्यांना असं सांगितल्याचंसुद्धा मान्य केलं आहे. काँग्रेस नेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भुवनेश्वर, 27 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर हिंसाचार भडकवल्याचा आरोप भाजपकडून काँग्रेसवर केला जात आहे. यातच भर घालणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ओडिसा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा हा व्हिडिओ आहे. यात ते कार्यकर्त्यांना पेट्रोल आणि डिझेलने सरकारी संपत्ती जाळण्याचे आदेश देत आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हिंसाचार भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. ओडिसामध्ये 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या विरोधात काँग्रेसने बंद पुकारला होता. पीडित मुलगी 13 डिसेंबरला बेपत्ता झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आंदोलकांनी मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप मांझी नवरंगपुर इथं आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी एका समर्थकाला फोटन केला आणि पेट्रोल-डिझेल तयार ठेवण्यास सांगितले.

जाहिरात

मांझी यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला फोन वर म्हटलं की,‘पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा, ऑर्डर दिली की सगळं जाळून टाका.’ यानंतर एका वापरात नसलेल्या कारला आग लावण्यात आल्याची घटना घडली. नवरंगपुर पोलिसांनी सांगितलं की, वरिष्ठ काँग्रेस नेत्याविरुद्ध हिंसाचार भडकवल्या प्रकरणी तक्रार दाखल केली असून त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. सर्व काही जाळून टाका असं आपण म्हटल्याचही मांझी यांना मान्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, महिला आणि मुलींवर बलात्कार होत आहेत. अशा परिस्थितीत गप्प बसू शकत नाही. लोकशाहीवरून माझा विश्वास उडाला आहे. अखेर इस्रोच्या माजी शास्त्रज्ञांना केरळ सरकारकडून 1.3 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: india
  • First Published :
जाहिरात
जाहिरात