प्योंगयांग (उत्तर कोरिया), 21 एप्रिल : किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या प्रकृतीविषयीची खरी माहिती फक्त त्यांच्या निकटवर्तीयांना आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या गुप्त सुरक्षारक्षकांना असण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचा हा हुकूमशहा नेमकं काय करतो, कसे निर्णय घेतो आणि देश कसा चालवतो याविषयी उर्वरित जगाला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. त्यामुळे किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर जगभरातून याविषयी उलट-सुलट बातम्या आणि चर्चा सुरू झाल्या. Grave danger after a surgery अशी त्यांच्या प्रकृतीविषयीची बातमी विदेशी इंग्रजी माध्यमांनी दिली आणि नेमकं ग्रेव डेंजरचा अर्थ काय घ्यायचा याविषयी चर्चा सुरू झाल्या. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांची प्रकृती नाजूक किंवा धोकादायकरीत्या गंभीर (Grave danger) असल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. वाचा - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका मात्र दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याचं सांगितले आहे. याआधी सीएनएनने असा दावा केला होता की, किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. प्रकृती अद्याप नाजूक असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या मृत्यूची शक्यताही व्यक्त केली होती.दक्षिण कोरिया सरकारच्या म्हणण्यानुसार किम जोंग-उनवर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती नाजूक किंवा धोकादायकरीत्या गंभीर (Grave danger) असल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. किम जोंग यांनी अलीकडेच देशाच्या राष्ट्रीय सुट्टीच्या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता, त्यानंतर त्यांच्या आजारपणाविषयी चर्चा सुरू झाल्या. वाचा - ..तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा किम जोंग उन यांना काही झालं तर उत्तर कोरियाचा कारभार त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे जाईल, असं बोललं जात आहे. किम यो ही या 7 किम जोंग भावंडांपैकी सगळ्यात धाकटी. 2011 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन यांच्याकडे राज्यकारभार आला तेव्हापासून ही धाकटी बहीणही प्रकाशझोतात आहे. किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग हे किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानले जातात. अन्य बातम्या किम जोंग उन यांनी असं काय केलं की Coronavirus पासून वाचला देश परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय कोरोनाचं थैमान: जगभरात 1 लाख 65 हजार लोकांचा मृत्यू, तर 24 लाख लोकांना लागण