मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

...तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा

...तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

जिनिव्हा येथील माध्यमांशी झालेल्या संभाषणात WHOचे प्रमुख टेड्रॉस यांनी 1918 च्या स्पॅनिश फ्लूशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची तुलना केली.

  • Published by:  Manoj Khandekar

जिनिव्हा, 21 एप्रिल : चीनला पाठीशी घातल्याचा आरोप असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरसबाबत एक इशारा दिला आहे. WHOच्या मते, 'कोरोनाची ही फक्त सुरुवात आहे, वाईट काळ अजून येणे बाकी आहे'. WHOने असा संशय व्यक्त केला आहे की कोरोनाचा प्रसार आशिया आणि आफ्रिकेत होण्यास सुरुवात झाली आहे. तर, युरोप आणि अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

WHOचे प्रमुख टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस यांनी, परिस्थिती आणखी वाईट होण्याची अनेक कारणे आहेत, असे सांगितले. मात्र वाईट परिस्थितीला कोणते घटक जबाबदार आहेत ते टेड्रोस यांनी सांगितले नाही. टेड्रोस यांनी सांगितले की, कोरोनामुळे आता आणखी काही देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. सध्या जगभरात 25 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

आशियाई आणि आफ्रिकन देशांना मोठा धोका

कोरोनाचा प्रसार आफ्रिका खंडात कमी झाला आहे. येथे संसर्गाची 24 हजार 171 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 1 हजार 164 लोक मरण पावले आहेत. इजिप्त, अल्जेरिया, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका आणि घाना हे त्याचे नवीन हॉट स्पॉट्स म्हणून उदयास आले आहेत. अल्जेरिया अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनामुळे मृत्यूची भीती नेहमीपेक्षा जास्त असते.

कोरोना संकटात इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, काय आहे दर?

आशिया खंडात भारतात सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत आणि येथे आतापर्यंत 18 हजार 539 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 592 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीचा सर्वात जास्त परिणाम आशियात झाला आहे आणि या देशाने इरानलाही मागे टाकले आहे. तुर्कीमध्ये या संसर्गामुळे 2000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

स्पॅनिश फ्लूशी केली कोरोनाची तुलना

जिनिव्हा येथील माध्यमांशी झालेल्या संभाषणात टेड्रॉस यांनी 1918 च्या स्पॅनिश फ्लूशी कोरोना विषाणूच्या संसर्गाची तुलना केली. ते म्हणाले, "1918 च्या फ्लूप्रमाणेच कोरोनासुध्दा एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. 1918 मध्ये या फ्लूने जवळपास एक कोटी लोकांचा जीव घेतला होता.

...तर राज्यात सुरु होऊ शकतात वाईन शॉप, आरोग्यमंत्र्यांची मद्यपींसाठी खूशखबर!

टेड्रोस यावेळी असेही म्हणाले की, "आता आमच्याकडे तंत्रज्ञान आहे, आपण ही आपत्ती टाळू शकतो, असे संकट आपण टाळू शकतो. आमच्यावर विश्वास ठेवा. सर्वात वाईट अद्याप येणे बाकी आहे. ही आपत्ती एकत्र थांबवा. हा एक व्हायरस आहे जो लोकांना अद्याप समजू शकत नाही". टेड्रोस असेही म्हणाले की WHO सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूच्या जोखमीबद्दल चेतावणी देत ​​आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published:

Tags: Corona