नवी दिल्ली, 11 जून: जगभरात फेसबुकचा (Facebook) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लाखो-कोट्यवधी लोकांचं फेसबुकवर अकाउंट असतं. परंतु फेसबुक अकाउंट असेलल्या एखाद्याचा मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्या अकाउंटचं काय होतं? फेसबुकवर अकाउंट असलेल्या एखाद्या युजरचा मृत्यू झाल्यास, त्याचं अकाउंट स्मरणात राहण्यासाठीचा पर्याय असतो. वारसा कराराखाली, निधन झालेल्या व्यक्तीचा वारस फेसबुक अकाउंट टाइमलाइनवर एक पोस्ट लिहू शकतो. परंतु मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अकाउंटवरील फोटो, पोस्ट आणि इतर माहिती डाउनलोड करण्यासाठी वारसाची परवानगी घ्यावी लागते.
जर फेसबुक अकाउंट स्मरणार्थ ठेऊ इच्छित असाल, तर Facebook Account वर नावाच्या पुढे ‘रिमेंबर’चा पर्याय दिसेल. वारस मृत व्यक्तीच्या अकाउंटमध्ये लॉगइन करू शकत नाही, तसंच त्याचे खासगी मेसेजही वाचू शकत नाही. परंतु वारस फेसबुकला त्या व्यक्तीचं अकाउंट कायमचं हटवण्यासाठी सांगू शकतात.
सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याचे Emails आणि Social Media अकाउंट्स असल्यास ती हस्तांतरणीय मालमत्ता आणि संबंधित व्यक्तीचा वारस ते अकाउंट चालवण्यासाठी परवानगी घेऊ शकतात.
फेसबुक आपल्या युजर्सला त्यांच्या इच्छेनुसार करारनामा करण्यास परवानगी देतात, त्याअंतर्गत मृत्यूनंतर त्यांतं अकाउंट चालवण्यासाठी कुटुंबातील सदस्य किंवा मित्राची निवड करू शकतात.