नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : सॅमसंगने (Samsung) आपल्या आयकॉनिक नोट लाइनअपला रिप्लेस करुन यावेळी ग्राहकांसमोर नवा फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) ठेवला आहे. सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 3 (Galaxy Z Fold3) आणि गॅलेक्सी Z फ्लिप 3 ने (Galaxy Z Flip3) फोल्डेबल सेगमेंटमध्ये नवी ओळख बनवली आहे. दोन्ही फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंगच्या Galaxy Z Flip3 ची किंमत 84,999 रुपये आहे. तर Galaxy Z Fold3 ची किंमत 1,49,999 रुपये आहे. Galaxy Z Fold 3 या सेगमेंटमध्ये अतिशय महागडा फोन आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर, यात काही बिघाड झाल्यास मोठी किंमत द्यावी लागते. द वर्जच्या रिपोर्टनुसार, Galaxy Z Fold 3 चं इंटिरिअर बनवण्यासाठी तब्बल 36000 रुपये द्यावे लागतात. तर Galaxy Z Flip3 साठी 27,500 रुपये खर्च येतो. या फोनची इंटरनल स्क्रिन तुटल्यास, दुसरा नवा फोन येईल, इतका खर्च येतो.
भारतात सॅमसंगने ग्राहकांना कंपनीकडून 1 वर्षासाठी सॅमसंग केअर + अॅक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. ज्याची किंमत 7999 रुपये आहे. यामुळे पहिल्या वर्षी स्क्रिन डॅमेज प्रोटेक्शन मिळेल. परंतु त्यानंतर फोनची स्क्रिन तुटल्यास, डॅमेज झाल्यास ग्राहकाला पैसे भरावे लागतील. भारतात रिपेअर कॉस्ट अमेरिकेहून अधिक आहे. फोनसाठी वेगवेगळे डिस्प्ले असतात आणि यासाठी इंजिनिअरिंगही वेगळं असल्याने याचा रिपेअर खर्च अधिक येतो.
सॅमसंग इंडिया वेबसाईटनुसार, Samsung Galaxy Fold 2 साठी मेन डिस्प्लेची रिपेअर कॉस्ट 45,004 रुपये आहे. तर सर्व डिस्प्ले 7396 रुपये आहे.